नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत

नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत
- Advertisement -

मुंबईदि. 26 (रानिआ) : औरंगाबादलातूरपरभणीचंद्रपूरभिवंडी- निजामपूरमालेगावपनवेलमीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिलाअनुसूचित जमाती महिलानागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांची आरक्षण सोडत काढल्यानंतर 6 ऑगस्ट 2022 रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्यावर 6 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. दाखल हरकती व सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण 20 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केले जाईलअसे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

-0-0-0-

- Advertisement -