Home शहरे मुंबई नदी उशाला, तरीही कोरडा घशाला!

नदी उशाला, तरीही कोरडा घशाला!

0
नदी उशाला, तरीही कोरडा घशाला!

[ad_1]

म. टा. वृत्तसेवा, वाडा

वाडा तालुक्यातील वडवली व आखाडा या गावांत अगदी उशाला नदी वाहत असतानाही रहिवाशांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. म्हणून ग्रामपंचायतीमधील चार मुख्य गावांसाठी लघु पाणीपुरवठा योजना द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

आखाडा ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या वडवली व घोडीचापाडा या गावात ५६९, तर आखाडा व भगतपाडा या गावात ६६९ लोकसंख्या आहे. चारही गावांना नदीचा विळखा असून बारमाही पाणी नदीपात्रात अनेक ठिकाणी असते. मात्र उंचावर वसलेल्या या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे. गावातील विहिरींनी सध्या तळ गाठलेला आहे. महिलांना मोठी पायपीट व चढाव चढून नदीपात्रात असलेल्या खड्ड्यांतून पाणी भरावे लागते, ज्यात खूप वेळ खर्ची होतो. शिवाय गढूळ पाण्याने आरोग्याचाही प्रश्न उभा राहतो.

ग्रामपंचायत विभाग गावांतील विहिरींमध्ये नदीतून मोटारीने पाणी भरण्याचा दरवर्षी प्रयत्न केला जातो, मात्र यात केवळ पैशांची नासाडी होत आहे. नागरिकांना कायमस्वरूपी उपाययोजना गरजेची आहे. प्रत्येक गावात लघु पाणीपुरवठा योजना सुरू करावी, अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे रहिवाशांनी सांगितले.

एप्रिल ते मान्सून प्रारंभापर्यंत डोक्यावर हंडे घेऊन नदीच्या कडेला खोदलेल्या खड्ड्यांतून पाणी जमविण्याची आमची कसरत एकही वर्षी टळत नाही. नदी पायथ्याशी राहूनही होणारी वणवण कोणत्या दुष्काळी भागापेक्षा कमी नाही. यात सुधारणा व्हावी हीच मागणी.

– संगीता कुवरा, महिला, भगतपाडा

आखाडा येथील एक विहीर आम्ही नदीतून पाणी आणून भरली आहे. आता लवकरच अन्य तीन गावांतील विहिरी याच पद्धतीने भरल्या जातील. गावात पाणी योजना करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी सादर केला होता, मात्र अद्याप त्याबाबत काही कार्यवाही झालेली नाही.

– प्रतिभा किरकिरे, सरपंच, आखाडा

[ad_2]

Source link