Home ताज्या बातम्या नवनिर्मित पोलीस महासंचालक कार्यालयाच्या कामाची गृहमंत्र्यांकडून पाहणी

नवनिर्मित पोलीस महासंचालक कार्यालयाच्या कामाची गृहमंत्र्यांकडून पाहणी

नागपूर, दि. 5: सेमिनरी हिल्स नागपूर येथील पोलीस महासंचालक कार्यालयाच्या इमारत बांधकामाची आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाहणी केली. पोलीस उपायुक्त गजानन राजमाने व पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आवारात गृहमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राजभवन चौक, सेमिनरी हिल्स येथे पोलीस महासंचालक यांचे कॅम्प ऑफिस व निवासस्थानाचे बांधकाम सुरु आहे. या कार्यालयाचे काम तीन महिन्यात पूर्ण होणार आहे.