Home शहरे जळगाव नवरा बायकोने एकमेकाचा आदर केल्यास सुखी संसार होईल ! आदेश बांदेकर

नवरा बायकोने एकमेकाचा आदर केल्यास सुखी संसार होईल ! आदेश बांदेकर

0

झिंगाट च्या तालावर महिलांनी धरला ठेका महिलांच्या रोजगारा बाबत महिलांनी उपस्थित केला प्रश्न

पारोळा : प्रतिनिधी पारोळा महिला राजकारणात येत असतात परंतु ज्या महिला निवडून येतात तेथे पुरुषार्थाची नवरे बुवाचा अधिकार जास्त चालत असल्याने स्त्री स्वतंत्र झाले नसल्याची खंत व्यक्त करीत आजच्या मुलीला लग्नासाठी शहरी भागातील हाच मुलगा पाहिजे,असा हलताना दिसत आहेत तर विवाहितांचे फारकती चे प्रमाण वाढत असल्याने हे कुठेतरी थांबले पाहिजे तर नवरा-बायको हे एका गाड्याच्या दोन दोन चातकाप्रमाणे एक जरी आवळला तर संसार उद्ध्वस्त झाले असल्याच्या घटना समोर येत असल्याने तेव्हा एकमेकांचा आदर करा माऊलीचा सन्मान करा हा संदेश देऊन प्रत्येक घरात अनेक महिलांना नतमस्तक होत असल्याचे भाऊ पगार होम मिनिस्टर व शिवसेनेचे सचिव व महिलांचे आवडते भावजी आदेश बांदेकर यांनी व्यक्त केले.
पारोळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हरिनाथ मंगल कार्यालयात अभिनेते व शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांचा खास महिलांसाठी माऊली संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आदेश बांदेकर यांनी या वेळी महिलांना बोलतं केलं त्या महिलांना ह्या कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नसून आपले हक्क त्यांनी दाखविला पाहिजे स्वतः हिंमतीने पुढे येऊन जनतेच्या हिताची कामे केली पाहिजे असे मत पंचायत समिती सभापती छायाबाई पाटील यांनी व्यक्त केले तर मे महिन्यात गारपीट झाली होती आणि पिकांचे नुकसान झाले मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आलेले नसल्याचे जिजाबाई पाटील यांनी सांगितले. तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे अभिनेत्यांचे कार्यक्रम ठेवले जातात का ?
असा प्रश्न मनीषा पाटील यांनी उपस्थित केला पारोळ्यात अनेक मुले मुलींच्या शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याची खंत मुलांनी व्यक्त केली . सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी शिवसेना काय प्रयत्न करीत आहे, असा थेट प्रश्न बडगुजर यांनी व्यक्त करून सासू-सासरे हे आपल्या आई-वडिलांना प्रमाणे असून त्यांना सांभाळ करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमात माजी आ.चिमणराव पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ , माजी नगराध्यक्ष नलिनीताई पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख महिला आघाडीच्या रचानाताई पाटील , महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील विधानसभा प्रमुख राजेंद्र पाटील, बाजार समिती सभापती अमोल पाटील, बाजार समिती संचालक, एरंडोल चे शिवसेना तालुकाप्रमुख व हजारो महिला या वेळी उपस्थित होत्या.