हायलाइट्स:
- यामीने चाहत्यांसोबत शेअर केले लग्नाचे फोटो
- सोशल मीडियावर यामीच्या लग्नातील फोटोंचा धुमाकूळ
- चाहत्यांनी फोटोंवर केला शुभेच्छांचा वर्षाव
…म्हणून अदिती पोहनकर ठरली २०२० मध्ये महाराष्ट्रातली सर्वाधिक आकर्षक महिला
यामीने तिच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात लग्नातील निरनिराळ्या विधींचे फोटोदेखील आहेत. हळदीपासून ते मेहंदीपर्यंत असे अनेक फोटो यामीने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामीने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. यामीदेखील नववधूच्या वेशात खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. फोटोंमध्ये यामीच्या कुटुंबातील व्यक्तींचाही समावेश आहे. काही फोटोमध्ये यामी तिची छोटी बहीण सुरीलीसोबत दिसत आहे.
सुरीलीने देखील यामीच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोत सुरीली यामीला हळद लावताना दिसत आहे. सोशल मीडियावर चाहते यामीचं खूप कौतुक करत आहेत. यामीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कित्येक कलाकार यामीला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. यामीने लग्नाची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं हे मात्र नक्की.
हो …म्हणून मीच घरातले कॅमेरे बंद केले होते; करणच्या आरोपांवर निशाचा धक्कादायक खुलासा