Home ताज्या बातम्या नवी मुंबई ते कफ परेड बेस्ट बस सेवा सुरु करण्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

नवी मुंबई ते कफ परेड बेस्ट बस सेवा सुरु करण्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

0
नवी मुंबई ते कफ परेड बेस्ट बस सेवा सुरु करण्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबई, दि. 9 : नवी मुंबई ते कफ परेड बेस्ट बस सेवा सुरु करण्याची मागणी लक्षात घेता याबाबत स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

फोर्ट येथील मुंबई महापालिकेच्या ए वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला  उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, आज 909 तक्रारी दाखल झाल्या असून 132 तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींचेदेखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती  महिलांना देण्यात आली.

अंधेरी गुंदवली येथील  के ईस्ट वॉर्ड येथे  दिनांक 10 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे. हा उपक्रम  31 मे 2023 पर्यंत  दुपारी 3 ते 5.30 या वेळेत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9  या लिंकवर जाऊन माहिती भरता येऊ शकते.

****

संध्या गरवारे/विसंअ/