नवी मुंबई महानगरपालिका कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वीच बोनस

- Advertisement -

 नवी मुंबई : महानगरपालिका ही राज्यातील अग्रगण्य महानगरपालिका म्हणून ओळखळी जात असून नागरिकांना दर्जेदार सेवासुविधांची पुर्तता करतानाच महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारीवृंदासही काम करण्यास उत्साहवर्धक वातावरण दिले जात आहे.

      या अनुषंगाने विविध विभागात काम करणा-या कंत्राटी कामगारांकडेही विशेष लक्ष दिले जात असून त्यांच्या चांगल्या कामगिरीचे वेळोवेळी कौतुकही करण्यात येत आहे. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये कंत्राटी स्वरुपातील सफाई कामगारांच्या उत्तम योगदानाचा उल्लेख नवी मुंबईचा गौरव केला जात असताना नेहमीच आदरपूर्वक केला जातो. त्यामुळेच किमान वेतनाचा ठराव मंजूर झाल्यानंतर लगेचच तेरा महिन्यांचा फरक देणारी नवी मुंबई ही राज्यातील एकमेव महानगरपालिका म्हणून नावजली जाते.

      त्यामुळे या कंत्राटी कामगारांचा दिवाळी सण आनंदात साजरा व्हावा यादृष्टीने सन 2018-19 या कालावधीतील कंत्राटी कामगारांचा बोनस 24 ऑक्टोबरपर्यंत अदा करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी यापूर्वीच दिलेले आहेत व त्या अनुषंगाने संबंधीत कंत्राटी कामगारांमार्फत ते कामगारांना अदाही केले जात आहेत.

      दिवाळीच्या काळात कंत्राटी कामगारांना लेव्ही अंतर्गत 8.33 टक्के बोनस रक्कम व 6 टक्के रजा रोखीकरण देयके अदा करण्यात येतात. ही रक्कम दिवाळीपूर्वी कामगारांच्या हातात मिळावी जेणेकरून त्यांना दिवाळीसण उत्साहात साजरा करता यावा याकरीता महापालिका प्रशासन सक्षम असून त्या अनुषंगाने कंत्राटी कामगारांना बोनस व अनुषांगिक रक्कम अदा करण्यात येत आहे.

- Advertisement -