Home ताज्या बातम्या नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याला आरपीआयचा पाठींबा;रामदास आठवलेंची घोषणा

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याला आरपीआयचा पाठींबा;रामदास आठवलेंची घोषणा

0
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याला आरपीआयचा पाठींबा;रामदास आठवलेंची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

‘नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेकापचे तथा नंतरच्या काळात शिवसेनेत दाखल झालेले दिवंगत नेते, माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या स्थानिक भूमीपुत्रांच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचा जाहीर पाठिंबा आहे’, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी येत्या १० जून रोजी भूमीपुत्रांनी मानवी साखळी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. दि. बा, पाटील यांचे नवी मुंबईच्या उभारणीत, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात मोठे योगदान आहे. कोकणातील शिक्षण प्रसारातही त्यांचे बहुमोल योगदान असल्याचे आठवले म्हणाले. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, आ. प्रशांत ठाकूर, आठवले गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदिश गायकवाड आदींनी आठवले यांची नुकतीच भेट घेतली होती.

Source link