Home शहरे उस्मानाबाद नवे संशोधन : आता सोशल डिस्टन्सिंगही वाढवावे लागणार

नवे संशोधन : आता सोशल डिस्टन्सिंगही वाढवावे लागणार

0

सोशल मिडीया नेटवर्क टीम । २८ मे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन किंवा सहा फुटाचे नव्हे तर त्यापेक्षा अधिकचे सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष कांही शास्त्रज्ञांच्या प्रयोगातून समोर आला आहे. सध्या एकमेकांमध्ये तीन किंवा चार फुटाचे अंतर राखून सामाजिक अंतर राखले जात आहे. नव्या संशोधनाने मात्र त्याला छेद गेला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे महत्व वारंवार सांगितलं जात आहे. पण सोशल डिस्टन्सिंग ठेवताना सहा फुटांचं अंतर ठेवणे पुरेसे नाही. कारण खोकल्याने किंवा शिंकल्याने करोना विषाणू जवळपास २० फुटांपर्यंत जाऊ शकतो. असं एका संशोधनात समोर आलं आहे. संशोधकांनी वेगेवगळ्या वातावरणात खोकणे, शिंकणे तसंच श्वास सोडताना निघणाऱ्या थेंबांचा अभ्यास केला आहे. एक मॉडेल तयार केलं आहे. यानुसार थंड आणि दमट हवामानात करोनाच्या विषाणूंचा फैलाव तीन पट वेगाने होऊ शकतो. हे स्पष्ट झाले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार खोकताना किंवा शिंकताना निघणारे थेंब २० फुटांपर्यंत प्रवास करत करोनाचा प्रादुर्भाव करु शकतात. यामुळे सध्या सोशल डिस्टन्सिंगमध्ये सहा फुटांचं अंतर ठेवलं जावं असं सांगणारा नियम करोनाला ऱोखण्यासाठी पुरेसा नसल्याचं समोर आलं आहे.

नुकत्याच खेळलेल्या प्रयोगांच्या आधारे संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, खोकणे, शिंकणे या सोबतच सामान्यपणे बोलताना जवळपास ४० हजार थेंब बाहेर पडू शकतात. हे थेंब प्रती सेकंद १०० मीटरपर्यंत प्रवास करु शकतात. वायुगती, उष्णता आणि वातावरणासोबत होणाऱ्या बदलांमधील प्रक्रिया विषाणूंचा प्रभाव किती होईल हे ठरवतं. मोठे थेंब गुरुत्वाकर्षणमुळे एखाद्या गोष्टीवर साचून राहतात. पण छोटे थेंब एरोसोल कण तयार कऱण्यासाठी वेगाने बाष्पीभवन करतात. हे कण व्हायरसचा फैलाव करण्यात सक्षम असतात आणि अनेक तास हवेत राहतात.

दरम्यान मास्क घातल्याने विषाणूंची लागण होण्याचा धोका कमी होतो. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन विषाणूंची लागण होण्याचा धोका टाळता येऊ शकतो असंही ते म्हणाले आहेत. मोठ्या थेंबांमधून विषाणूंचा प्रसार होण्याचं अंतर कमी असतं. हे विषाणू नष्ट होण्याआधी एखाद्या गोष्टीवर साचून राहतात. पण जर हे विषाणू एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर साचले तर मात्र चेहऱ्याला हात लावण्याने, डोळे चोळल्याने विषाणू शरिरात जाऊ शकतात. पण सोशल डिस्टन्सिंग पाळत हे टाळलं जाऊ शकतं असं संशोधकांनी सांगितलं आहे. दरम्यान करोनाच्या पॅटर्नचा अभ्यास अद्यापही संशोधक करत असून त्याबद्दल ठोस असा निष्कर्ष अजून निघालेला नाही.