नशिराबाद येथे विहिरीत आढळला मृतदेह

- Advertisement -

नशिराबाद, जि. जळगाव : नशिराबाद शिवारात भादली रस्त्यालगत असलेल्या एका शेतातील विहिरीत २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा विवस्त्रवस्थेत विहिरीत मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना गुरूवारी सकाळी ८़३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ याप्रकरणी जयेश हरी धांडे यांनी दिलेल्या खबरीवरून नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आली आहे़
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की, नशिराबाद शिवारात भादली रस्त्यालगत असलेल्या रोहिदास लिलाधर चौधरी यांच्या शेतामधील विहिरीत पंचवीस ते तीस वर्षीय अनोळखी पुरुषाचे विवस्त्र अवस्थेत पाण्यात मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, प्रवीण ढाके, राजेंद्र साळुंखे, गुलाब माळी यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. सुमारे दोन-तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही आत्महत्या की घातपात याबाबत तर्क-वितर्क होत आहे़

- Advertisement -