Home मनोरंजन नसीरुद्दीन शाह यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; मुलानं शेअर केला फोटो

नसीरुद्दीन शाह यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; मुलानं शेअर केला फोटो

0
नसीरुद्दीन शाह यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; मुलानं शेअर केला फोटो

[ad_1]

हायलाइट्स:

  • ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांना मिळाला डिस्चार्ज
  • न्यूमोनियाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले होते
  • नसीरुद्दीन यांना डिचार्ज मिळाल्याचे मुलगा विवाने सोशल मीडियावर दिली माहिती

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना न्यूमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. आता नसीरुद्दीन यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून घरी आलेल्या नसीरुद्दीन यांचा फोटो त्यांचा मुलगा विवानने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

नसीरुद्दीन शाह यांना न्यूमोनिया झाल्याने त्यांना २९ जून रोजी रुग्णालयात दाखल केले होते. नसीरुद्दीन यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृतीत सुधारणा झाल्याने रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नसीरुद्दीन आणि रत्ना यांचा मुलगा विवान शाहने इन्स्टाग्रामवरून त्यांना डिस्चार्जची माहिती दिली आहे. तसेच विवानने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये नसीरुद्दीन यांची दोन छायाचित्रे शेअर केली आहेत, यातील एका फोटोमध्ये ते आपली पत्नी रत्ना पाठक शाहसोबत दिसले आहेत. दुसर्‍या छायाचित्रात अभिनेते एकटेच बसलेले दिसत आहेत, पण बाजूला असलेल्या आरशात रत्नाही दिसत आहेत. पहिल्या फोटोवर विवानने “बॅक टू होम” लिहिले आहे, तर दुसर्‍या फोटोवर “त्यांना आजच सकाळीच डिस्चार्ज मिळाला आहे’, असे लिहिले आहे.

AssignmentImage-733007492-1625744673

न्यूमोनियाचा छोटा पॅच होता
नसीरुद्दीन यांची पत्नी अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले होते की, नसीरुद्दीन यांच्या फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाचा एक छोटा पॅच आहे. त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अनेक सिनेमांत केले काम

AssignmentImage-1856431667-1625744673

दरम्यान, नसीरुद्दीन शाह यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून अभिनयाच्या शिक्षण घेतले आहे. त्यानंतर ‘निशांत’, ‘जाने भी दो यारो’, ‘इजाजत’, ‘बाजार’, ‘मासूम’,’मिर्च मसाला’ यांसारख्या समांतर सिनेमांत केलेले काम आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. समांतर सिनेमांबरूरच नसीरुद्दीन यांनी ‘कर्मा’, ‘त्रिदेव’,’विश्वात्मा’, ‘चमत्कार’, ‘मोहरा ‘, ‘सरफरोश’, ‘द डर्टी पिक्चर,’ ‘कृष ‘, ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ यांसारख्या व्यावसायिक सिनेमांतही काम केले आहे.

[ad_2]

Source link