Home ताज्या बातम्या नागझरी-वंजारवाडी रस्ता, ओढयावरील पूल न बांधल्यास ग्रामस्थ करणार आंदोलन

नागझरी-वंजारवाडी रस्ता, ओढयावरील पूल न बांधल्यास ग्रामस्थ करणार आंदोलन

0

माण खटाव-डॉ विनोद खाडे
-सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी शेजारील नागझरी ते वंजारवाडी रस्त्यावर लक्ष्मीनगर,माळवे वस्ती येथे एक मोठा ओढा पाण्याने भरून वाहत असून दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने येथील ग्रामस्थांना सुमारे तीन फूट पाण्यातून रोज पायपीट करावी लागत आहे, पहा बातमी सविस्तर
लक्ष्मी नगर,माळवे वस्ती येथील लोकसंख्या सुमारे 300 च्या वर असून या लोकांना त्यांच्या शेती कामी, भाजीपाला,किराणा व इतर जीवनोपयोगी वस्तू आणण्यासाठी या ओढ्यातुन रोज जावं लागतं, तसेच शालेय विद्यार्थी, वृद्ध व्यक्ती,पशुपालक यांनाही याच मार्गाने जावं लागतं. रात्री च्या वेळी वीज ही येथे नसल्याने अंधारातुन जाणे जीवघेणे ठरू शकते.लोकप्रतिनिधी सह सर्वाना या लोकांनी पुलाबाबत अनेक वेळा विनंती करूनही त्याची आजअखेर कोणी दखल घेतली नाही, सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्या पूल बांधकामाचा सर्व्हे केला असून ही गेली अनेक वर्षे हे काम रखडले आहे.पावसाळ्यात पाऊस झाल्यानंतर सुमारे पाच महिने या ओढ्यातून पाणी वाहत असल्याने येथील ग्रामस्थांना रोज पाण्यातून जावं लागत आहे.याची संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी, अन्यथा जनावरसह तहसील कार्यालयात उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.