हायलाइट्स:
- कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर नागरिकांनी तुफान दगडफेक केली. ही खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास रामेश्वरीनजिकच्या टोली येथे घडली.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे ४०० पोलिसांचा ताफा टोलीत पोहोचला असून, पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे.
- या घटनेने या परिसरात तणावाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टोलीत अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अजनी पोलिसांचे पथक कारवाईसाठी तेथे वाहनाने पोहोचले. पोलिसांचे वाहन बघताच परिसरातील महिला व नागरिकांनी पोलिसांना घेराव घातला. पोलिसांच्या वाहनांवर तुफान दगडफेक केली. जीव वाचविण्यासाठी वाहन तेथेच सोडून पोलिस निघून गेले. या घटनेचे वृत्त व छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले.
क्लिक करा आणि वाचा- नागपुरात करोनात दुहेरी जनुकीय बदल; विषाणूचे पाच नवे प्रकार
या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी व सुमारे ४०० पेक्षा अधिक पोलिसांनी परिसराला घेराव घातला. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरू केली. या घटनेने या परिसरात तणावाचे वातावरण आहे.
क्लिक करा आणि वाचा- … तर मग अजित पवारांचा राजीनामा घेणार का?; आशीष शेलारांचे प्रत्युत्तर
क्लिक करा आणि वाचा- बारामतीत ५ मे पासून ७ दिवस कडक लॉकडाऊन; अजित पवार यांनी निर्देश देताच…