नागपूर:
नागपूर जिल्ह्यात कन्हान येथील वेकोली कोळसा खाण परिसरातील मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. सततच्या पावसामुळे जमीन खचून ढिगाऱ्यावर बसलेले हे तीन मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
कन्हान भागात कोळसा खाणी आहेत. अनेक अनेक कोळसा खाणी अवैध असून तिथून कोळसा आणि माती काढण्याचे काम सुरू असते. आज देखील जेसीपी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने माती उपसून कोळसा शोधण्याचे काम अवैधरित्या सुरू होते. यावेळी मातीच्या ढिगाऱ्यावर विश्रांती घेत तीन मजूर बसले होते. पावसापाण्यामुळे जमीन भूसभूशीत झाली असल्याने खचली आणि मातीच्या ढिगाऱ्यावर बसलेले तिघेही जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
- Advertisement -