Home बातम्या ऐतिहासिक निंबवडे वितरिकेच्या बंदिस्त पाईपलाईन कामाची पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली पाहणी – महासंवाद

निंबवडे वितरिकेच्या बंदिस्त पाईपलाईन कामाची पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली पाहणी – महासंवाद

0
निंबवडे वितरिकेच्या बंदिस्त पाईपलाईन कामाची पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली पाहणी – महासंवाद

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : आटपाडी तालुक्यातील टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत आटपाडी डाव्या कालव्यावरील कि. मी. ७ मधील निंबवडे वितरिकेच्या कामाची क्षेत्रीय पाहणी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले, अधिक्षक अभियंता मिलींद नाईक व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

निंबवडे वितरिकेचे एकूण लाभक्षेत्र 1 हजार 300 हेक्टर इतके असून मुख्य वितरिकेची लांबी 27.200 कि. मी. इतकी आहे. बंदिस्त नलिका प्रणालीच्या 18 कि.मी. व 19 कि.मी. मधील विमोचकांची पाहणी करून तेथील वितरिकेच्या कामाचे तसेच पाण्याचा दाब पाहून पालकमंत्री जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

00000