Home गुन्हा निगरगट्ट शिवसेना व महापालिकेविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल – सचिन सावंत

निगरगट्ट शिवसेना व महापालिकेविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल – सचिन सावंत

उघड्या गटारीत पडलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्या दिव्यांशचा शोध थांबवला आहे. 48 तास उलटून गेल्यानंतरही गटारीत वाहून गेलेला दिव्यांश सिंह अद्याप सापडलेला नाही. नाईलाजानं मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन विभागानं ही शोधमोहीम थांबवली. गेल्या 48 तासांत अग्निशमन दलाच्या जवानांनी 10 किमीच्या परिसरातील ड्रेनेज लाईन, मॅनहोल या ठिकाणी दिव्यांशचा शोध घेतला. एनडीआरएफलाही पाचारण करण्यात आले, मात्र हाती काहीच लागलं नाही. आता यावरून मुंबई महापालिका आणि शिवसेनेवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

खुल्या गटारात पडलेल्या चिमुकल्या दिव्यांशचा शोध थांबविला आहे. त्याच्या अपघाताला शिवसेना व बीएमसी जबाबदार आहे. गतवर्षीही एक डॉक्टर गटारात पडून गेले. महापौर व बीएससीकडून उत्तर निलाजरेपणाची येत आहेत. निगरगट्ट शिवसेना व महापालिकेविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे. असा घणाघात कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे.