मुंबई:प्रतिनिधी गोवा महामार्गावर झालेल्या खड्ड्यांना जबाबदार धरून महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणे यांनी चिखलाची आंघोळ घातली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणे यांना गुरुवारी अटक करण्यात आली होती. आज दुपारी तीनच्या सुमारास त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंनी याप्रकरणावर युक्तीवाद केल्यानंतर न्यायाधिशांनी नितेश राणे यांना ९ जुलै पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावली. तसेच त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, नितेश राणे यांना अटक झाल्यानंतर कणकवली बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.
- Advertisement -