Home बातम्या ऐतिहासिक ‘निमा’च्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – आरोग्यमंत्री राजेश टोपे

‘निमा’च्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0
‘निमा’च्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई दि. 16 : नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

निमा संघटनेच्या विविध मागण्यांबाबत आज सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. टोपे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक झाली. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, आरोग्य विभागाचे उपसचिव विजय लहाने, ईएसआयसीचे संचालक डॉ.संजय ढवळे, नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले, सहसंचालक संजय सरवदे आदी उपस्थित होते.

निमा संघटनेच्या वतीने डॉ. सत्यजित पाटील यांनी विविध प्रकारच्या मागण्यांबाबत निवेदन आरोग्यमंत्री श्री.टोपे यांना दिले. त्यावर वेतन वाढ, भरती प्रक्रिया, मुंबई नर्सिंग ॲक्ट मधील नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्था मधील भरती प्रक्रियेत बीएएमएस पदवीधर नियुक्ती करण्यात यावी या मागण्यांबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, परिवहन विभाग आणि नगरविकास विभागाच्या वतीने संयुक्त प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. टोपे यांनी दिल्या.

यावेळी निमा संघटनेच्या वतीने सचिव डॉ. अभय तांबिले, डॉ. राजेंद्र खटावकर यांनी म्हणणे मांडले.

***

रवींद्र राऊत/विसंअ/