Home शहरे मुंबई नियमभंग करून विवाहसोहळा

नियमभंग करून विवाहसोहळा

0
नियमभंग करून विवाहसोहळा

[ad_1]

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबईः करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाउन घोषित करून संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू केले असतानाही पनवेल तालुक्यातील वरची करंबेळी गावातील चौधरी कुटुंबीयांनी मास्कचा वापर न करता तसेच एकमेकांमध्ये सुरिक्षत अंतर न ठेवता, लग्नसोहळा आयोजित करून सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पनवेल तालुका पोलिसांनी बोहल्यावर चढणाऱ्या वधु-वरासह त्यांचे आई-वडील व इतर नातेवाईक अशा एकूण नऊ जणांवर सरकारच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पनवेल तालुक्यातील मोरबी येथील वरची करंबेळी गावातील येथील धर्मा इरू चौधरी यांनी सोमवारी भरदुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास मुलगा वासुदेव धर्मा चौधरी व खालची करंबेळी येथील मुलगी सुजिता दत्तात्रय भगत या दोघांच्या लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते. चौधरी कुटुंबीयांनी व लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांनी कुठल्याही प्रकारचे सुरक्षित अंतर ठेवले नसल्याचे तसेच मास्कचा वापर न करता एकत्र जमल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिस नाईक सागर रसाळ व पोलिस शिपाई मासाळ यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी चौधरी कुटुंबीयांना पाचजण एकत्र जमून सुरक्षित अंतर न पाळता लग्नसोहळा आयोजित केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पोलिसांनी लग्नसोहळा आयोजित करणारे धर्मा इरू चौधरी (६०) त्यांची पत्नी ध्रुपती धर्मा चौधरी (४५), त्यांचा मुलगा वासुदेव धर्मा चौधरी (२५), नवरी मुलगी सुजिता दत्तात्रेय भगत (१९), धुरी दत्तात्रेय भगत (४५) दत्तात्रेय नारायण भगत (१९), लहु हिरू चौधरी (६५), चांगु इरू चौधरी (४२) आणि बबन कान्हा कडाळी (४५) या नऊ जणांविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

[ad_2]

Source link