Home मनोरंजन निर्माते रमेश तौरानी फेक वॅक्सीनेशनचे शिकार, Tips च्या ३६५ कर्मचाऱ्यांना नाही मिळालं सर्टिफिकेट

निर्माते रमेश तौरानी फेक वॅक्सीनेशनचे शिकार, Tips च्या ३६५ कर्मचाऱ्यांना नाही मिळालं सर्टिफिकेट

0
निर्माते रमेश तौरानी फेक वॅक्सीनेशनचे शिकार, Tips च्या ३६५ कर्मचाऱ्यांना नाही मिळालं सर्टिफिकेट

[ad_1]

मुंबई- करोना साथीमुळे भारतातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. असं असलं तरी सरकार लसीकरणातून आपल्या नागरिकाचं संरक्षण करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. पण यातही लसीकरणात फसवणूक होत असल्याच्या बातम्या समोर आल्या असून लोकांना खोटे लसीकरण केले जात आहे. सिनेनिर्माते रमेश तोरानी हेही खोट्या लसीकरणाला बळी पडले. तोरानी यांना आता आपल्या कर्मचार्‍यांना बनावट लसी लावल्याची भीती वाटत आहे. बनावट लसीविरोधात त्यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

टिप्स कंपनीचे मालक आणि सिनेनिर्माते रमेश तोरानी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ३० मे ते ३ जून या कालावधीत आपल्या ३६५ कर्मचार्‍यांना लस दिली होती, परंतु अद्याप त्यांना प्रमाणपत्रे मिळाली नाहीत. रमेश तोरानी यांच्या कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना एसपी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून लस दिली होती.

लसीकरणाविषयी बोलताना रमेश तोरानी म्हणाले की, ‘आम्ही लसीच्या प्रमाणपत्राची वाट पाहत आहोत. माझ्या कार्यालयातील लोकांनी एसपी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे संजय गुप्ता यांच्याशी संपर्क साधला होता आणि त्यांनी १२ जूनपर्यंत सर्व प्रमाणपत्र मिळतील असे सांगितले. आमच्याकडे ३६५ कर्मचार्‍यांनी लसीकरण केले आणि १२०० रुपये प्रति डोस तसेच जीएसटी कंपनीने भरले.’

रमेश तोरानी पुढे म्हणाले, ‘आम्हाला पैशांची चिंता नाही, तर खरं कोविशिल्ड होतं की काही मीठ पाणी होतं याची आम्हाला चिंता आहे. आम्हाला सांगितले गेले की आम्हाला मुंबईतील कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रुग्णालयातून लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळेल. पण अद्याप ते मिळालेले नाही.’

[ad_2]

Source link