हायलाइट्स:
- एप्रिलमध्ये भारताची व्यापारी निर्यात ३०.२१ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.
- गेल्या वर्षी एप्रिलच्या तुलनेत यंदा निर्यातीत १९७.०३ टक्के वाढ झाली आहे.
- औषधे, ज्वेलरी, ताग, तयार कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी वस्तू , लोह खनिज यांच्या निर्यातीत वाढ
एप्रिल २०२० मध्ये १०.१७ अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली होती. यंदा त्यात १९७.०३ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल २०१९ मधील २६.०४ अब्ज डॉलर्सपेक्षा १६ टक्के अधिक होती. एप्रिल महिन्यात भारतात ४५.४५ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात करण्यात आल्या. एप्रिल २०२० मधील १७.०९ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत १६५.९९ टक्के वाढ झाली तर एप्रिल २०१९ मधील ४२.३९ अब्ज डॉलर्सपेक्षा ७.२२ टक्के वाढ झाली आहे .
बंगालमध्ये भाजपची हार ;सेन्सेक्स-निफ्टी गडगडले, एक लाख कोटींचा चुराडा
एप्रिल २०२१ मध्ये १५.२४ अब्ज डॉलरची व्यापार तुटीसह भारत निव्वळ आयातदार आहे. एप्रिल २०२० मध्ये व्यापार तूट ६.९२ अब्ज डॉलर्स होती, त्यात १२०.३४ टक्के वाढ झाली तर एप्रिल २०१९ मधील १६.३५ अब्ज डॉलर्स व्यापार तुटीच्या तुलनेत ६.८१ टक्के घट झाली आहे.
करोनाचा कहर ; सोने-चांदी तेजीत , जाणून घ्या किती रुपयांनी महागले सोने
एप्रिलमध्ये बिगर पेट्रोलियम निर्यातीचे मूल्य २६.८५ अब्ज डॉलर्स होते, जे एप्रिल २०२० मधील ८.३ अब्ज डॉलर्सपेक्षा २०० टक्के अधिक आहे. एप्रिल २०२१ मध्ये बिगर -पेट्रोलियम आणि बिगर-जवाहिरे निर्यात २३.५१ अब्ज डॉलर्स होती. एप्रिल २०२० मधील ८.९० अब्ज डॉलर्सच्या तुलनेत १६४.२८ टक्के वाढ झाली. गेल्या महिनात भारतात १०.८ अब्ज डॉलर्सचे तेल आयात करण्यात आले. एप्रिल २०२० मधील ४.६५ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत १३२.२६ टक्के सकारात्मक वाढ तर एप्रिल २०१९ मधील ११.५६ अब्ज डॉलरच्या तुलनेत ६.६२ टक्के उणे वाढ झाली.
अर्थव्यवस्था सुस्साट! एप्रिलमध्ये ‘जीएसटी’मधून तब्बल १.४१ लाख कोटींचा रेकॉर्डब्रेक महसूल
एप्रिल २०२१ मध्ये बिगर-तेल आयात ३४.६५ अब्ज डॉलर्स एवढी होती, जी एप्रिल २०२० मधील १२.४४ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत १७८.६ टक्के वाढली आहे. एप्रिल २०१९ मधील ३०.८२ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत १२.४२ टक्के अधिक आहे.