देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकी दरम्यान तीन वेळा इंधनाचे दर घटले. मात्र, आता निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत रिलायन्सच्या पेट्रोलच्या दरात ५८ पैसे आणि डिझेलमध्ये २२ पैसे वाढ झाली आहे. इंडियन ऑइलचे पेट्रोल १२ पैसे आणि डिझेल १७ पैशांनी वाढले आहे. एचपी कंपनीचे पेट्रोल १६ पैसे तर डिझेल २१ पैशांनी महागले आहे.
- Advertisement -