नीना गुप्ता येताच आमच्या कॉलेजमध्ये हंगामा व्हायचा- सतीश कौशिक

नीना गुप्ता येताच आमच्या कॉलेजमध्ये हंगामा व्हायचा- सतीश कौशिक
- Advertisement -


हायलाइट्स:

  • नीनाची आणि माझी मैत्री अतूट आहे, सतीश कौशिक यांनी व्यक्त केल्या भावना
  • आत्मचरित्रात नीना यांनी दिलेल्या संदर्भाला सतीश यांनी दिला दुजोरा
  • आजही आमच्या दोघांमधील मैत्रीचे नाते दृढ आहे

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांचे ‘सच कहूं तो‘ हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले. हे आत्मचरित्र आल्यापासून नीना खूप चर्चेत आल्या आहेत. नीना यांनी त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याबरोबरच मनोरंजन सृष्टीतील अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. त्याचप्रमाणे नीना यांनी ज्या ज्या अभिनेत्यांसोबत, दिग्दर्शकांसोबत काम केले आहे, त्यांच्यासोबतचे अनेक मनोरंजक किस्सेही या आत्मचरित्रामध्ये लिहिले आहेत. यामध्ये नीना यांनी त्यांचे सहकलाकार सतीश कौशिक यांच्याबद्दलही काही गोष्टी लिहिल्या आहेत. नीना यांनी सांगितलं की, जेव्हा त्या गरोदर होत्या तेव्हा सतीश कौशिक यांनी त्यांना लग्नासाठी विचारणा केली होती. या सगळ्यावर सतीश यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

प्रेग्नन्ट नीना गुप्ता यांना सतीश कौशिकनी केलं होतं लग्नासाठी प्रपोज, वाचा संपूर्ण किस्सा
नीना आणि सतीश एकत्र शिकले

सतीश कौशिक यांनी ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘ नीनासोबतची माझी मैत्री १९७५ पासून आहे. तेव्हापासून आमच्याच खूप छान बाँडिंगही आहे. आम्ही एकमेकांची खूप मस्करी करतो. मी तिला नैंसी आणि ती मला कॅशिकन अशी हाक मारते. मी तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना चांगला ओळखतो. आम्ही दिल्लीतील करोल बागमध्ये जवळ जवळ रहायचो. आम्ही दोघेजण दिल्ली युनिर्व्हसिटीमध्ये एकत्र शिकलो आहेत आणि नाटकांमध्येही काम केले आहे.’

नीना अनेकांची क्रश होती!

या मुलाखतीमध्ये सतीश यांनी पुढे सांगितले,’नीना जेव्हा कॉलेजमध्ये यायची तेव्हा एकच गोंधळ उडायचा. कारण नीना तिच्या विचारांमुळे आणि तिच्या दिसण्यामुळे अनेकांसाठी क्रश होती. तिच्याकडे अनेकजण आकर्षित झाले होते. त्यानंतर दोन वर्षांनी मी आणि नीनाने नॅशनल स्कूल ऑफ ड्राममध्ये प्रवेश घेतला. आम्ही दोघांनीही सिनेमात येण्यासाठी खूप संघर्ष केला. त्यानंतर आम्हाला जाने भी दो यारों आणि मंडी या सिनेमांमध्ये काम मिळाले.’

‘त्याने मला हॉटेलच्या रूममध्ये बोलावलं आणि…’, नीना गुप्ता यांचा कास्टिंग काऊचवर धक्कादायक खुलासा

AssignmentImage-1211381633-1624007127

मला कायम नीनाचे कौतुक वाटते

सतीश यांनी पुढे सांगितले, ‘ आम्ही कितीही आमच्या कामात व्यग्र असलो तरी जेव्हा आम्ही एकमेकांना भेटतो तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा देतो. आम्ही याच गोष्टींमध्ये जास्त रमतो. तिने आयुष्यात जसा संघर्ष केला, तो पाहून मी कायमच तिचे कौतुक केले आहे. खास करून जेव्हा ती मसाबाच्यावेळी गरोदर होती तेव्हा…’

एक चांगली मैत्रीण म्हणून तिच्यावर प्रेम केले

नीना प्रेग्नंट असल्याची माहिती काही मोजक्या लोकांनाच होती. त्यामध्ये सतीश यांचा समावेश होता. त्याबद्दल सतीश यांनी मुलाखतीमध्ये सांगितले, ‘ज्या काळात लग्नाशिवाय एखादी मुलगी प्रेग्नंट राहू शकतो आणि बाळाला जन्म देऊन आई होऊ शकते हे समाजाच्या विरोधात होते. परंतु ही हिंमत नीनाने दाखवली, त्याबद्दल मला तिचे कायमच कौतुक वाटत आले आहे. त्या काळात एक चांगला मित्र म्हणून मी तिच्यासोबत होतो. तुम्ही जर तिचे आत्मचरित्र वाचले तर तुमच्या लक्षात येईल की, मी जे काही केले ते एका मित्राच्या प्रेमापोटी आणि त्याच नात्याने केले होते. त्या कठीण काळामध्ये नीनाने एकटे राहू नये असे मला वाटले होते आणि याच कठीण काळामध्ये मित्रांचा उपयोग होतो ना?’

AssignmentImage-872234891-1624007127

प्रेग्नन्ट नीना गुप्ता यांना मित्रानं दिला होता ‘गे’ व्यक्तीशी लग्न करण्याचा सल्ला, पण..

…आणि नीनाच्या डोळ्यांत अश्रू तरळले

नीना यांना लग्नाची मागणी घातल्याबद्दल सतीश यांनी या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले, ‘या आत्मचरित्रामध्ये मी नीनाला लग्नासाठी मागणी घातली यासंबंधी लिहिले आहे. ही मागणी म्हणजे नीनासाठी मला वाटणारी काळजी होती. तिचा सन्मान, तिच्यासाठी पाठिंबा, तिची चिंता हे सगळे वाटून घेण्यासाठी म्हणून केली होती. मी तिला तेव्हा म्हटलेही होते की, मी तुझ्यासोबत आहे मग तू चिंता कशाला करतेस? हे ऐकून नीनाच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले होते. त्या दिवसापासून आमच्यातील मैत्री अधिक दृढ आणि घट्ट झाली. एक अभिनेत्री म्हणून तिने खूप छान काम केले आहे. ती आपल्या समाजातील एक सक्षम आणि खंबीर महिला म्हणून ओळखली जाते. नीनाचे पती विवेक मेहरा हे देखील माझे चांगले मित्र आहेत.’

AssignmentImage-400329181-1624007127


तू आरामात लिही,काही हरकत नाही

नीना यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांच्याबद्दल जे लिहिले आहे त्याची तुम्हाला माहिती होती का असा प्रश्न सतीश यांना विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले, ‘नीना आत्मचरित्र लिहित आहे, याबद्दल तिने मला सांगितले होते. त्याबद्दल तुला काही आक्षेप तर नाही ना, असेही तिने मला विचारले होते. तेव्हा मी तिला सांगितले तुला जे वाटते ते आरामात लिही. मला काहीच हरकत नाही. नीनाने जे धैर्य दाखवले त्यासाठी मी नैंसीला सॅल्यूट करतो. माझी बायको शशीला आमच्या मैत्रीबद्दल सगळे काही माहिती आहे. नीना कायम आमच्या घरी येते. शशीने माझ्या आणि नीनाच्या मैत्रीचा कायमच सन्मान केला आहे.’

फार कमी वयात झालं होतं नीना गुप्ता यांचं पहिलं लग्न, वाचा वर्षभरात का झाला घटस्फोट



Source link

- Advertisement -