Home मनोरंजन नुसरत जहां- निखिल जैनचा दोन वर्षांचा संसार मोडला, अभिनेत्रीनं डिलिट केले लग्नाचे फोटो

नुसरत जहां- निखिल जैनचा दोन वर्षांचा संसार मोडला, अभिनेत्रीनं डिलिट केले लग्नाचे फोटो

0
नुसरत जहां- निखिल जैनचा दोन वर्षांचा संसार मोडला, अभिनेत्रीनं डिलिट केले लग्नाचे फोटो

[ad_1]

हायलाइट्स:

  • आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे नुसरत जहां
  • निखिल जैनसोबत झालेलं लग्न नुसरत जहांनं केलं अमान्य
  • नुसरत जहांनं इन्स्टाग्रामवरून डिलिट केले निखिल जैनसोबतच्या लग्नाचे सर्व फोटो

मुंबई: बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहां सध्या तिचं वैवाहिक आयुष्य आणि पती निखल जैनपासून वेगळी झाल्यानं चर्चेत आहे. नुसरतनं बुधवार ९ जूनला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये २०१९ साली बिझनेसमन निखिल जैनसोबत टर्की कायद्यानुसार झालं असून या लग्नाला भारतात कायदेशीर मान्यता नसल्याचं सांगत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यानंतर आता तिनं सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे सर्व फोटो डिलिट केले आहेत. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या मोडलेल्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

कोण आहे यश दासगुप्ता? ज्याच्याशी नुसरत जहांचं अफेअर असल्याच्या होतायत चर्चा
नुसरतनं इन्स्टाग्रामवरून लग्नाचे फोटो डिलिट करण्याआधी बुधवारी म्हणजेच ९ जूनला एक स्टेटमेंट देत निखिल जैनवर धक्कादायक आरोप केले होते. निखिलनं तिचे सर्व खानदानी दागिने आणि पैसे सेफमधून काढून घेतल्याचा आरोप नुसरतनं केला आहे. निखिल जैन आणि नुसरत जहां यांचं हे लव्ह मॅरेज होतं दोघं एकमेकांना २०१७-१८ मध्ये भेटले होते. २०१९ मध्ये खासदार झाल्यानंतर निखिल आणि नुसरत टर्की येथे एका भव्य विवाहसोहळ्यात लग्नाच्या बेडीत अडकले होते.


नुसरत जहांचं लग्न २०१९ मध्ये पार पडलेल्या सर्वच विवाहसोहळ्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेलं लग्न होतं. नुसरत आणि निखिलनं टर्कीमध्ये लग्न केलं होतं आणि हनीमूनसाठी ते ग्रीसला गेले होते. या दोघांच्या लग्नापासून ते हनीमूनपर्यंत सर्वच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. पण आता नुसरतनं निखिल जैनसोबत टर्कीमध्ये झालेल्या लग्नाचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून डिलिट केले आहेत.

‘निखिल, माझ्या बँकेतून न विचारता पैसे, दागिने काढायचा’, नुसरत जहांचे नवऱ्यावर गंभीर आरोप
एवढंच नाही तर तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्याचं कॅप्शन सर्वाचं लक्ष वेधून घेताना दिसतंय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलंय, ‘मी आता त्या महिलेला आठवू इच्छित नाही. जी नेहमीच आपलं तोंड बंद ठेवत असे. मी अशीच आनंदी आहे.’


दरम्यान आपल्या स्टेटमेंटमध्ये नुसरतनं म्हटलंय, ‘निखिल आणि माझं लग्न इंटर रिलिजन होतं. त्यामुळे आम्ही दोघांनी भारतातील ‘स्पेशल मॅरेज अॅक्ट’नुसार लग्न करणं अपेक्षित होतं. इथल्या कायद्यानुसार हे लग्न झालेलं नव्हतंच त्यामुळे याला लग्न म्हणता येणार नाही. हे केवळ एक लिव्ह इन रिलेशनशिप होतं. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा प्रश्नच येत नाही.’ नुसरतच्या म्हणण्यानुसार ती आणि निखिल खूप अगोदरच वेगळे झाले होते.

नुसरत जहां होती गँगरेप आरोपीच्या प्रेमात, निकाहही होणार होता पण..



[ad_2]

Source link