Home शहरे अहमदनगर नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील घटना विहीर उडी घेऊन तरून शेतकर्यांची आत्महत्या

नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील घटना विहीर उडी घेऊन तरून शेतकर्यांची आत्महत्या

0

नेवासा (प्रतिनिधी)

नेवासा : कर्जबारीपणाला कंटाळून विहीर उडी घेऊन बाळासाहेब भाऊसाहेब गोंडे (वय 37 वर्षे) रा.भेंडा खुर्द ता.नेवासा या तरुण शेतकऱ्यांने काल रविवार दि.24 नोव्हेंबर रोजी रात्री घरा जवळच्या पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

याबाबद मिळालेली माहिती अशी की,नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील भेंडा-गोंडेगाव रस्तावरील गोंडे वस्तीवर राहणार तरुण शेतकरी
बाळासाहेब भाऊसाहेब गोंडे याने रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घरा जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.आत्महत्ये पूर्वी सायंकाळी साडे ते साडे सात वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब याने भेंडा बुद्रुक बसस्थानक चौकात आपल्या सहकाऱ्यांबरोबर होता .तेथून तो सरळ भेंडा खुर्द मधील आपल्या घरी गेला.घरी गेल्यावर रात्री 8 वाजेच्या सुमारास घराकडून तो विहीरीकडे पळतच गेला. पळत जाऊन त्याने विहिरीत उडी घेतली. त्यावेळी त्याच्या मागे त्याचा भाऊ ही पळत गेला. परंतु त्याला काही कळण्याच्या आतच बाळासाहेब पाण्याने काठिकाठ भरलेल्या 50 फूट खोलीच्या विहीरीत उडी घेतली.
त्याला स्वतःलाही आणि भावालाही पोहता येत नव्हते त्यामुळे तो पाण्यात बुडला.भावाने आरडाओरडा करून इतरांना एकत्र केले मात्र रात्रीचा अंधार आणि पाण्याने भरलेली विहीर यामुळे बाळासाहेब याला वाचवण्यासाठी वेळेत मदत न मिळाल्याने त्याचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला.
कर्जबाजरीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे.
मयत बाळासाहेब यांचे मागे आई-वडील,भाऊ,एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे.
नेवासाचे तहसीलदार व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून रात्री उशिरा साडे दहा नंतरही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होते.