Home शहरे अहमदनगर नेवासा – शेवगांव रस्ता दुरुस्तीसाठी बांधकाम खाते कार्यालयासमोर छञपती युवासेना बांधकाम खात्याचा करणार दशक्रियाविधी !रस्त्यावर प्रतिकात्मक अंतयाञा काढूनही बांधकाम विभागाला येईना जाग !

नेवासा – शेवगांव रस्ता दुरुस्तीसाठी बांधकाम खाते कार्यालयासमोर छञपती युवासेना बांधकाम खात्याचा करणार दशक्रियाविधी !रस्त्यावर प्रतिकात्मक अंतयाञा काढूनही बांधकाम विभागाला येईना जाग !

0

नेवासा,प्रतिनिधी

नेवासा – शेवगांव राज्यमार्गाची प्रचंड दुरावस्था झालेली आसून रस्त्यात मोठ – मोठे खड्डे पडल्यामुळ वाहनधारकांना प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी छञपती युवासेनेने बांधकाम खात्याची रस्त्यावर प्रतिकात्मक प्रेतयाञा काढली होती यावेळी बांधकाम विभागाने आठ दिवसात रस्ता दुरुस्त करण्यात येईल असे आश्वासन देवून महीना झाला तरीही रस्ता दुरुस्त होत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवार (दि १४) रोजी नेवासा फाटा येथील बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर खात्याचा ‘दशक्रियाविधी’ करणार आसल्याचे लेखी निवेदन छञपती युवासेनेचे प्रदेश संघटक कमलेश नवले यांनी दिले आहे.


नेवासा – शेवगांव राज्यमार्गाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे.रस्त्यात प्रचंड खड्डे पडल्यामुळ अनेक अपघात झालेले आहे.बांधकाम खाते रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त केला जात आहे या रस्ता दुरुस्तीसाठी छञपती युवासेनेने बांधकाम खात्याची प्रतिकात्मक अंतयाञा काढली होती यावेळी सात दिवसात रस्ता दुरुस्ती करण्याचे लेखी निवेदन बांधकाम विभागाने छञपती युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेले होते.माञ महिना उलटला तरी रस्ता दुरुस्त झाला नसल्याने आता १४ जानेवारीला बांधकाम खात्याचा ‘दशक्रियाविधी’ बांधकाम विभागासमोर करण्यात येणार आसल्याचे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र नवथर,तालुका प्रमुख निलेश कडू,विद्यार्थी आघाडी तालुका प्रमुख कृष्णा नवथर,तालुका उप प्रमुख गणेश नवथर, तालुका सरचिटणीस बाबासाहेब सरकाळे,तालुका अध्यक्ष पप्पू बोधक,तालूका संपर्क प्रमुख अक्षय बोधक,तालुका कार्यध्यक्ष संदेश बोधक,ज्ञानेश्वर गव्हाणे शेवगाव तालुका अध्यक्ष,अभिजीत बोधक व अनेक कार्यरते उपस्थित होते.