Home शहरे अहमदनगर नेवासा – शेवगांव राज्यमार्गाची दुर्दशा ! निष्पाप वाहनधारकांचा बळी घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याचीच प्रतिकात्मक प्रेत याञा काढणार – नवले

नेवासा – शेवगांव राज्यमार्गाची दुर्दशा ! निष्पाप वाहनधारकांचा बळी घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याचीच प्रतिकात्मक प्रेत याञा काढणार – नवले

0

नेवासा: ( प्रतिनिधी)

नेवासाफाटा ते शेवगांव राज्यमार्गाच्या रस्त्याची मोठीे दुरावस्था झाली आसून रस्त्यात मोठ – मोठी खड्डे पडल्यामुळे रस्त्याची संपुर्ण चाळण झाली आहे.त्यामुळे या रस्त्यावर दररोज निष्पाप वाहन चालकांचे अपघात होत आहेत. वाहनधारकांना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आयुष्यभर अधू होण्याची वेळ आली आहे. तर काही वाहन चालकांना हाकनाक जीव गमवावा लागत आसून या अपघाताला सार्वजनिक बांधकाम खातेच जबाबदार आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाला लेखी निवेदन देवूनही दुरुस्ती होत नाही.त्यामुळे वाहनधारकांना जर जीव गमवावा लागत असेल तर सार्वजनिक बांधकाम खात्याचीच प्रकात्मक प्रेत याञा रस्त्यावर काढू असा इशारा छञपती युवा सेनेचे प्रदेश संघटक कमलेश नवले यांनी प्रसिद्धी पञकान्वये दिला आहे.
या निवेदनात नवले यांनी म्हटले आहे की, नेवासाफाटा ते शेवगांव राज्यमार्गाची चाळण झालेली आसून रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरुन वाहने चालवतांना मोठी कसरत करावी लागत आहे.त्यामुळे दररोज अपघात होवून लोक अधू होत आहेत.या रस्त्यावर मोठी वाहनांची वर्दळ असते.ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना आसल्यामुळ मोठी उस वाहतूक करणाऱ्या बैल गाड्यांसह ट्रक,टॅक्टर वाहनांची मोठी संख्या आसतांना अवैद्ध प्रवाशी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर सुरु आसते.माञ रस्त्याची झालेली चळण खड्यात पडलेले खड्डे दुरुस्ती होत नाही त्यामुळे निष्पाप लोकांचे प्राण जात आसून सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याकडे दुर्लक्ष करत आसल्याने निष्पाप वाहनधारकांचा जीव घेणाऱ्या बांधकाम खात्याची शेवगांव मार्गावर प्रतिकात्मक प्रेत याञा काढण्याचा इशारा छञपती युवा सेनेचे प्रदेश संघटक कमलेश नवले,अक्षय बोधक,राहूल बोधक आदींनी प्रसिद्धी पञकात दिला आहे.