हायलाइट्स:
- नोकरी मिळवून देतो अशा भूलथापा देत तरुणीवर बलात्कार
- मध्य प्रदेशातील रीवा येथील धक्कादायक घटना
- अश्लील व्हिडिओ काढून पीडितेला करत होता ब्लॅकमेल
- पोलिसांनी आरोपीला केली अटक
मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षीय तरुणीचे काही महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते. कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी ती आरोपीच्या संपर्कात आली. आरोपीने तिला नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. तसेच तिला एका राजकीय पक्षाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष करतो अशा भूलथापाही त्याने दिल्या. तिला भाडेतत्वावर घर घेऊन दिले. तिथे तिच्यावर वारंवार अत्याचार केले. आरोपीने तिचे अश्लील व्हिडिओ काढले होते. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत होता.
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने तिचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी अश्लील व्हिडिओ तिच्या सासरच्या लोकांना पाठवले. त्यामुळे तिचे लग्नही मोडले. अखेर या सगळ्या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाइल जप्त केला आहे. तपासणीसाठी सायबर सेलकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.