हायलाइट्स:
- पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राबाबत अभिनेत्रीनं केलाय धक्कादायक खुलासा
- राज कुंद्राचा पीए उमेश कामतनं अभिनेत्रीकडे केली होती न्यूड शूटसाठी विचारणा
- अभिनेत्रीनं ट्वीटमधून राज कुंद्रा आणि उमेश कामतवर केले आहेत गंभीर आरोप
निकिता फ्लोरा सिंहनं तिच्या ट्विटर हॅन्डलवर लिहिलं, ‘मला उमेश कामतनं मागच्या वर्षी नोहेंबरमध्ये राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अॅप न्यूड शूट करण्यासाठी विचारणा केली होती. पण मी त्याला नकार दिला होता. उमेश कामतनं मला रोज २५ हजार रुपये देण्याचं कबूल केलं होतं. पण मी न्यूड शूट करण्याचा त्याचा प्रस्ताव नाकारला. आता या दोघांनाही अटक झाली याच मलाही आश्चर्य वाटलं. देवाची कृपेनं मी राज कुंद्राशी संबंधीत या प्रस्तावा बळी पडले नाही. त्यानं करिअरमध्ये संघर्ष करत असलेल्या अनेक अभिनेत्रींना पैशाचं आमिष दाखवून या बिझनेसमध्ये ओढलं आहे. झाराखंडच्या एका मुलीचा घटस्फोट झाला आहे कारण तिन राज कुंद्रासाठी काम केलं होतं.’
दरम्यान याआधी अभिनेत्री श्रुती गेराने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये खळबळजनक आरोप केले आहेत. तिने या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘बॉलिवूडमध्ये अनेकदा नवोदित कलाकारांना ड्रग्ज देऊन त्यांचे न्यूड व्हिडिओ काढले जातात. त्यानंतर त्यांना पॉर्न फिल्ममध्ये काम करण्यासाठी जबरदस्ती केली जाते.’ श्रुतीने तिच्या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले की, ‘राज कुंद्राची कंपनी नवोदित अभिनेत्रींना वेब शोमध्ये काम दिले जाईल, असे सांगत त्यांच्याशी करार करायचे. त्यानंतर त्यांच्याकडून अश्लिल व्हिडिओ करण्याची मागणी केली जायची. काही अभिनेत्रींनी मला राजच्या कंपनीतील काही लोकांनी त्यांच्याकडे न्यूड व्हिडिओ मागितल्याचेही सांगितले होते.’
दरम्यान राज कुंद्रानं देखील स्वतःवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यानं मुंबई उच्च न्यायालयात, आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा बेकायदेशीर असल्याचं अपील केलं आहे. अशात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत राज कुंद्राची पोलीस कोठडी २७ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज कुंद्रा चौकशी दरम्यान सहकार्य करत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तसेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंही पती राज कुंद्रावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. हॉटशॉट्सवर प्रसारित करण्यात आलेले व्हिडिओ हे पॉर्न नाही तर एरॉटिका व्हिडिओ असल्याचं तिनं म्हटलं आहे. पॉर्न आणि एरॉटिका दोन्हीमध्ये फरक असतो आणि पोलीस ज्या कंपनीबद्दल बोलत आहेत ही कंपनी राज कुंद्रा नाही तर त्याच्या बहिणीचा नवरा चालवत असल्याचंही तिने सांगितलं.