न्हावरे गावाच्या सुपुत्रांनी केली गावाला भरीव मदत

- Advertisement -

पुणे : प्रतिनिधी

पोलीस उपविभागीय अधिकारी मा.विक्रम कदम व भारत शिल्ड फोर्स चे सर्वेसर्वा मा.सचिन मोरे यांनी दीड महिन्यापासून संचारबंदी लागू असल्यामुळे कोरोनाविषयीचा संसर्ग पसरत आहे या पार्श्वभूमीवर न्हावरे गाव व परिसर येथील अत्यंत गरीब व वंचित, निराधार, गरजू, असंघटीत कामगारांवर उपासमारी वेळ येऊ नये म्हणून अक्कुलकुव्वा विभागाला नियुक्त असलेले पोलीस उपविभागीय अधिकारी मा.विक्रम कदम व पी-४ उपक्रमातील भारत शिल्ड फोर्से चे मालक श्री.सचिन मोरे व सन २००२ च्या एसएससी बॅच यांच्या पुढाकारातून उपाययोजना म्हणून अशा सर्व कुटुंबियांना सर्व प्रकारच्या पालेभाज्या व अंडे चे किट वाटप करण्यात आले.

७०० पेक्षा जास्त कुटुंबाना जीवनउपयोगी अन्नपदार्थाचे डॉ.बाबासाहेब आबेडकर सांस्कृतिक भवन न्हावरे येथे सुरक्षित अंतर ठेवून गावातील विशेष पोलीस अधिकारी यांच्या हस्ते मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले.
ग्रामस्थांना पुढील दोन आठवड्याचे अन्नपदार्थ सहज उपलब्ध करून दिले आहे. अशा अत्यंत गरजू ग्रामस्थांना या पुढेही मदत करणार आहे असे पी-४ च्या मुख्य समन्वयक सचिन मोरे यांनी केले आहे.

अन्नधान्याच्या किट वाटप कार्यक्रम प्रसंगी माजी आदर्श सरपंच श्री.गौतम कदम, माजी उपसरपंच श्री.गणेश निंबाळकर, माजी बँक अधिकारी रमाकांत कदम,माजी ग्रा.स.जगन्नाथ मोरे, माजी उपसरपंच रणजित गेलोत, माजी प्राचार्य श्री.भगवानराव मोरे, दीपक कोकडे,अमोल कांगुणे, सकाळ चे पत्रकार प्रताप भोईटे, पुढारीचे संजय गायकवाड, प्रभात चे योगेश मारणे, उत्तम कदम,सुनील मोरे,अरुण मोरे,शहाजी जाधव, प्रकाश जाधव, किरण जाधव,सागर पवार, पंकज गेलोत, दिनेश कदम …इ मान्यवंतांच्या उपस्थितीमध्ये यांच्या नियोजनात वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी २००२ च्या एसएससी बॅच चे सौ.दीपाली कदम(सावंत), एपीआय मानसिंग वचकल पाटील, एपीआय आदिनाथ खरात, एपीआय सतिश जगताप, एपीआय सचिन कांडगे,पो.ना.प्रदीप कांबळे, अय्याज मणियार,दिनेश गायकवाड,नितीन नवले,शरद जठार,रयत क्रांचीचे गणेश साळुंके,राहुल गावडे, किरण कांडगे,ग्रामविकास अधिकारी रवींद्र गोसावी, प्रवीण सोनवणे,जयंत सातकर,सीताराम कुटे…,इ मित्रपरिवाराने सहकार्य केले.

न्हावरे ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपामुळे सध्याच्या परिस्थिती मध्ये खूप मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून आले त्यामुळे सर्वांनी या सुपुत्रांचे यांनी आभार मानले.

- Advertisement -