Home ताज्या बातम्या न्हावरे मधील ७०० कुटुंबियांना पी-४ संस्था व भारत शिल्ड फोर्स यांच्या कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

न्हावरे मधील ७०० कुटुंबियांना पी-४ संस्था व भारत शिल्ड फोर्स यांच्या कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख

न्हावरे मधील ७०० कुटुंबियांना पी-४ संस्था व भारत शिल्ड फोर्स यांच्या कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोरोना च्या संसर्गामुळे गावांच्या व वाड्यावस्त्यांच्या सर्व स्थलांतरित व अस्थलांतरित ग्रामस्थांचे दीड महिन्यापासून लागू असलेल्या संचारबंदी मुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते त्या पार्श्वभूमीवर न्हावरे गाव व परिसर येथील अत्यंत गरीब व वंचित, निराधार, गरजू, असंघटीत कामगारांवर उपासमारीमुळे पी-४ उपक्रमातील भारत शिल्ड फोर्से चे मालक श्री.सचिन मोरे व पी-४ संस्थेच्या माध्यमातून उपाययोजना म्हणून जीवनावश्यक अशा सर्व प्रकारच्या पालेभाज्या व अंडे चे किट वाटप करण्यात आले.

७०० पेक्षा जास्त कुटुंबाना जीवनउपयोगी अन्नपदार्थाचे डॉ.बाबासाहेब आबेडकर सांस्कृतिक भवन न्हावरे येथे सुरक्षित अंतर ठेवून केले.ग्रामस्थांना पुढील दोन आठवड्याचे अन्नपदार्थ सहज उपलब्ध करून दिले आहे. अशा अत्यंत गरजू ग्रामस्थांना या पुढेही मदत करणार आहे असे पी-४ च्या मुख्य समन्वयक सचिन मोरे यांनी केले आहे.

अन्नधान्याच्या किट वाटप कार्यक्रम प्रसंगी ग्रामपातळीवरील आपत्ती व्यवस्थापणचे अधिकारी व विशेष पोलीस अधिकारी वर्गाच्या नियोजनात वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी पी-४ मधील संभाजी उकिरडे,ब्रिजेश तिवारी बालाजी माने,प्रमोद देशमुख ,राज राठोड, दिलीप सोनवणे, प्रकाश जाधव,विजय पाचंगे,किंमतीलाल शर्मा, किशोर जाधव, वैभव पाटील, प्रकाश लोले,प्रवीण वाळके,शरद काळे,शरद शिंदे,प्रवीण ढोकळे,अनिल बेंद्रे,किशोर सरोदे,मनोज चौगुले,दिलीप क्षेत्रे, गुप्तेश्वर सिंग,ज्ञानेश्वर गायकवाड,नयन घुले, चंद्रसेन साळुंके …इ. खूप मोठे आर्थिक योगदान दिले.

पी-४ संस्थेचे व सर्व खाजगी चालक मालकांचे ग्रामस्थांनी जीवनावश्यक वस्तूंचे सध्याच्या परिस्थिती मध्ये वाटप झाल्याने खूप मोठा दिलासा मिळाला त्यामुळे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.