Home ताज्या बातम्या पंडित जवाहरलाल नेहरू यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पंडित जवाहरलाल नेहरू यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

0

पुणे : देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्‍या प्रतिमेला ‍जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले.

पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हाधिकारी सारंग कोडलकर, नायब तहसिलदार श्रावण ताते यांनीही पंडित नेहरू यांच्‍या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.