पंढरपूर : सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court आज मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे. त्यानंतर आज पंढरपुरात Pandhrpur सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात मुंडण आंदोलन केले आहे. यावेळी राज्यातील एकाही मंत्र्यांला व आमदार MLA- खासदारांना रस्त्यावरुन फिरू देणार नाही. प्रसंगी त्यांच्या गाडया फोडू असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. Maratha Kranti Thok Morcha agitation in Pandharpur
मराठा Maratha समाजाला आरक्षण मिळावा अशी अनेक वर्षांची मागणी आहे. आरक्षण संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय देत, मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मराठा क्रांती मोर्च्याचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांच्या नेतृत्वखाली आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj चौकात सरकारच्या विरोधात अर्धनग्न व मुंडण आंदोलन करुन न्यायालयाच्या निर्णयाचा जाहीर निषेध केल आहे.
आजच्या सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे व मराठा समाजाचे लक्ष लागले होते. सकाळ पासूनच मराठा समाजातील कार्यकर्ते व आरक्षण प्रश्नांवर लढा देणारे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी पंढरपुरात दाखल झाले. निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल अशी आशा बाळगून आलेल्या काही कार्यकर्त्यांनी जल्लोशाची तयारी देखील केली होती. Maratha Kranti Thok Morcha agitation in Pandharpur
अहमदनगर मधील पेहेरेवाडी गावात एका शेतकऱ्यानं माळरानात पिकवल सोनं ( पाह व्हिडिओ )
परंतु ऐनवेळी निकाल विरोधात आल्याची माहिती मिळताच, त्याच कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात बोंब मारुन आंदोलन केले आहे. यावेळी पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम तातडीने दाखल झाले होते. आंदोलनामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्च्याचे राज्य समन्वयक महेश डोंगरे, रामभाऊ गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, स्वागत कदम, शशिकांत पाटील, धनाजी साखळकर, संदीप मुटकूळे, संतोष कवडे आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस Police बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे. त्यामुळे मराठा समाजावर मोठा अन्याय झाला आहे. न्यायालयात मराठा आरक्षणा संदर्भात बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावी ही आमची मागणी आहे. जो पर्यंत आरक्षण दिले जात नाही तो पर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आज पासून राज्यभर आंदोलन सुरु केले जाणार आहे,असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला. Maratha Kranti Thok Morcha agitation in Pandharpur
एकाही मंत्र्याची गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सरकार व सरकारमधील सहभागी मंत्री अपयशी ठरले आहेत. आरक्षणा संदर्भात एकाही मंत्र्यांनी आता पर्यंत आवाज उठवला नाही. जे मराठा मंत्री सत्तेत आहेत. त्यांनाही कधी समाजाचा विचार केला नाही. अशा समाज विघातक मंत्र्यांना व आमदार खासदारांना देखील रस्त्यावरुन फिरु देणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड व सुनील नागणे यांनी दिला आहे.
Edited By- Digambar Jadhav