Home गुन्हा पंढरपूर ; बोकडाचे जेवण जेवायला न आल्याच्या रागातून हत्या

पंढरपूर ; बोकडाचे जेवण जेवायला न आल्याच्या रागातून हत्या

0

पंढरपूर : देवकार्याच्या जेवणाला न आल्याच्या रागातून युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील पळशी गावात ही घटना घडली आहे. आरोपी दिंगबर वाघमारेने देवाला बोकड कापले होते. बोकडाचे जेवण जेवायला न आल्याच्या रागातून मयत सोमनाथ मोरेला बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर मयताचे डोके भिंतीवर आपटून हत्या करण्यात आली. आरोप दिगंबर वाघमारे हा गावचा ग्रामपंचायत सदस्य आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जण अटकेत आहेत.