हायलाइट्स:
- पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच मंदिराने केली हसरी पोस्ट
- मंदिराची पोस्ट पाहून नेटकरीही भावुक
- पुन्हा कणखरपणे उभं राहण्यासाठी नेटकऱ्यांनी दिल्या शुभेच्छा
पडद्यावर महिला रिक्षाचालक बनून कसं वाटलं? योगिता चव्हाण म्हणते…
राजच्या निधनानंतर मंदिराने पहिल्यांदाच तिचा आणि कुटुंबाचा हसरा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोत मंदिरा तिच्या दोन्ही मुलांसोबत आहे. शिवाय फोटोत मंदिराचे आई- वडिलही आहेत. या फोटोत राज यांची उणीव नक्कीच जाणवते परंतु, फोटोतील मंदिराचं हसू पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिचा उत्साह वाढवला आहे.
हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, ‘फक्त प्रेम, प्रेमासाठी, आपुलकीसाठी आणि दयेसाठी मी माझ्या कुटुंबाची आभारी आहे.’ मंदिराच्या या पोस्टवर तिची जवळची मैत्रीण मौनी रॉय हिने प्रतिक्रिया देत मंदिराचं कौतुक केलं आहे. यासोबतच अनेक कलाकारांनी आणि मित्रमंडळींनीही मंदिराचं कौतुक केलं आहे.
मंदिराची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी तिला अशीच हिम्मत करून कणखरपणे उभं राहण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. राज यांचं निधन झाल्यानंतर मंदिराने पतीच्या पार्थिवाला खांदा दिला होता. परंतु, तिच्या कपड्यांवरून मंदिराला ट्रोल करण्यात आलं होतं. तेव्हा अनेक कलाकारांनी एकत्र येऊन ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं होतं. मंदिराची परिस्थिती लक्षात न घेता तिला ट्रोल केल्याबद्दल कलाकारांनी ट्रोलर्सना खडे बोल सुनावले होते.