Home गुन्हा पतीनेच केला डोक्यात दगड घालून पत्नीचा खुन

पतीनेच केला डोक्यात दगड घालून पत्नीचा खुन

0

गेवराई शहरातील घटनेने उडाली खळबळ

गेवराई (रिपोर्टर) गेवराई शहरातील जायकवाडी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असुन परिसरात खळबळ उडाली आहे. गेवराई शहरातील जायकवाडी वसाहत येथील बाप्पासाहेब घुले यांनी आपली पत्नी गंधराबाई बप्पासाहेब घुले (वय अंदाजे 65 वर्ष) हिला आधी काठीने मारहाण करत डोक्यात दगड घालून हत्या करण्यात केली. सदरील ईसम हा मनोरूग्ण असल्याचे समजते घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड पोलीस निरीक्षक चोबे सह अनेक कर्मचारी दाखल झाले असून आरोपी बप्पासाहेब याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.