Home ताज्या बातम्या पतीने पत्नीने स्वयंपाक वेळेवर का केला नाही पत्नीची

पतीने पत्नीने स्वयंपाक वेळेवर का केला नाही पत्नीची

0

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख

वाखारी/दौंड, दि. ११ मे (प्रतिनिधी) : पत्नीने स्वयंपाक वेळेवर केला नाही म्हणून काठीने व चाकूने मारहाण करून तिची हत्या केल्याची घटना दौंड तालुक्यातील वाखारी येथे घडली आहे.

सदर गुन्ह्याची हकीकत अशी कि, आरोपी पतीने पत्नीने स्वयंपाक वेळेवर का केला नाही म्हणून तिला शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच तिला व तिच्या १९ वर्षीय मुलाला काठीने मारहाण करू लागला. तेव्हा मुलाने काठी हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपीने खिशातून चाकू काढून पत्नीस व मुलास मारहाण केली. पत्नीस चाकूने पोटात वार केल्याने ती गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली. त्यांचा आरडा ओरडा ऐकून शेजारी मध्ये आले असता त्यांच्यावरही आरोपीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. दवाखान्यात नेत असताना आरोपीची पत्नी मरण पावली तर इतर जखमी दवाखान्यात
उपचार घेत आहेत.

सदर गुन्ह्याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून पुढील
तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.