हायलाइट्स:
- आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे नुसरत जहां
- निखिल जैनसोबत झालेलं लग्न नुसरत जहांनं केलं अमान्य
- नुसरत जहांनं इन्स्टाग्रामवरून डिलिट केले निखिल जैनसोबतच्या लग्नाचे सर्व फोटो
काही दिवसांपूर्वी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी नुसरतच्या प्रेग्नन्सीवर आपलं मत मांडलं होतं.त्यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत होती. सध्या नुसरतचा गरोदरणातला बेबी बम्पसोबतचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय.
पतीला माहिती नाही
तस्लिमा नसरीन यांनी त्याच्या फेसबुकवर नुसरत संदर्भात एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी नुसरतला पती निखिल जैनपासून घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला होता. तस्लिमा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘नुसरतच्या प्रेग्नन्सीचं वृत्त चर्चेत आहे. पण याबाबत तिचा पती निखिलला मात्र काहीच माहीत नाही. मागच्या सहा महिन्यांपासून दोघंही वेगळे राहत आहेत आणि नुसरत अभिनेता यश दासगुप्ताच्या प्रेमात आहे.’