हायलाइट्स:
- पती निधनाच्या दुःखातून अजूनही सावरली नाही मंदिरा
- मंदिराने राज यांच्या आठवणीत व्याकूळ होऊन शेअर केली पोस्ट
- चाहत्यांनी आणि मित्रमंडळींनी मंदिराचे सांत्वन करत दिला धीर
मंदिराने एका टिश्यू पेपरचा फोटो काढून तो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या पेपरवर मंदिराने ‘राजी…’ हे दोनच शब्द लिहिले. हा फोटो शेअर करत मंदिराने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मिस यू राजी…’ आणि त्यासोबत हार्ट ब्रेकचा इमोजी शेअर केला आहे. राज यांना प्रेमाने राजी असे म्हटले जायचे. मंदिराची ही पोस्ट खूपच भावूक करणारी आहे.
राज यांच्या जाण्याच्या धक्क्यातून अजूनही मंदिरा पुरती सावरलेली नाही. तिला प्रत्येक क्षणाला राज यांची आठवण येत आहे. या दुःखातून मंदिराला तिचे मित्रमंडळी सावरत आहेत, धीर देत आहेत. परंतु मंदिरा अजूनही या दुःखातून बाहेर आलेली नाही. मंदिराने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी आणि मित्रमंडळींनी कमेन्टद्वारे तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.
याआधीदेखील मंदिराने पती राज कौशल यांच्यासोबत व्यतित केलेल्या काही भावूक क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ते दोघेजण खूप आनंदी दिसत होते.
मंदिराने निर्माता-दिग्दर्शक राज कौशल यांच्यासोबत १९९९ मध्ये लग्न केले होते. लग्नाला १२ वर्षे झाल्यानंतर त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी वीर असे ठेवले. त्यानंतर या दोघांनी २०२० मध्ये मुलीला, तारा हिला दत्तक घेतले होते. हे चौघेजण खूप आनंदात होते. परंतु अचानक राज यांच्या जाण्याने या तिघांवर दुःखाचा डोंगर कोसळला.