हायलाइट्स:
- आज नाना पटोलेंच्या लग्नाचा वाढदिवस
- सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट
- पत्नीचे मानले आभार
‘त्यांच्या भक्कम साथीमुळेच मतदारसंघातील व राज्यातील लाखो लोकांच्या समस्या प्रश्न जाणून त्या सोडवण्यासाठी बळ मिळते’ अशा शब्दात नाना पटोले यांनी पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी पत्नीसोबतचा एक सुंदर फोटोदेखील शेअर केला आहे.
‘आज आमच्या लग्नाचा वाढदिवस, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना पत्नीची खुप मोलाची साथ मिळत राहिली आणि यापुढेही मिळत राहील याबद्दल त्यांचे खुप खुप आभार. त्यांच्या भक्कम साथी मुळेच मतदारसंघातील व राज्यातील लाखो लोकांच्या समस्या प्रश्न जाणून त्या सोडवण्यासाठी बळ मिळते.’ असं नाना पटोले यांनी पोस्टमध्ये लिहलं आहे.
यानिमित्त नाना पटोले यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहलं की, ‘समाजकारण आणि राजकारण करत असताना जनता हेच माझे प्रथम कुटुंब हे मी मानत आलो आहे यामुळेच कदाचीत कुटुंबासाठी जास्त वेळ देता येत नाही याबद्दल पत्नी म्हणून कोणतीही तक्रार न करता माझ्या पाठीशी खंभीरपणे उभ्या राहणाऱ्या धर्मपत्नी आपणास वैवाहिक जीवनातील या सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.’