Home शहरे अकोला पथ्रोट जवलापूर ते बोराळा रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते भूमिपूजन   

पथ्रोट जवलापूर ते बोराळा रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते भूमिपूजन   

0
पथ्रोट जवलापूर ते बोराळा रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते भूमिपूजन   

अमरावती , दि. १४ : अचलपूर व चांदुर बाजार तालुक्यात ग्रामीण भागातील रस्ते बांधणीची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहेत, तसेच आवश्यक त्या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली.

राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते आज पथ्रोट जवलापूर ते बोराळा रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

अचलपूर पंचायत समितीअंतर्गत पथ्रोट जवलापूर ग्रामपंचायत येथे रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले .या कामाची अंदाजित किंमत सात लक्ष पाच हजार एवढी आहे .सरपंच गंगाताई पवार, उपसरपंच मोहनराव काळमेघ , माजी जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य वासंतीताई मंगरोळे , सभापती डॉ . अजय कडू , प्रितीताई बंड, तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

प्रत्येक गाव स्वयंपूर्ण बनण्यासाठी गाव रस्तेमार्गाने दुसऱ्या गावाला जोडणे आवश्यक आहे. रस्ते चांगले असल्यास गावात शेतकी व इतर कामेही वेळेवर होतात . तसेच आरोग्य , शिक्षण सर्व क्षेत्राचा विकास होतो.  या दृष्टीने ग्रामविकासासाठी संपूर्ण ग्रामीण भागातील रस्ते बांधणीची तसेच दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास श्री कडू यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाला विविध मान्यवर, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.