परंतु पाचव्यांदा मात्र गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले

- Advertisement -

औरंगाबाद : तो मूळ मध्यप्रदेशातला. बहीण-भाऊजीकडे राहायचा. मुजरी काम करायचा. तब्बल तीनवेळा हातावर ब्लेड मारून तर चौथ्यांदा विष पिऊन आत्महत्येचा त्याने प्रयत्न केला. यात तो वाचलाही; परंतु पाचव्यांदा मात्र गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (ता. दोन) सायंकाळी सहाच्या सुमारास औरंगाबादेतील मिसारवाडी भागात घडली.

आकाशकुमार हंसराजकुमार जाधव (वय 20) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळ मध्यदेशातील आहे. त्याची बहीण व भाऊजी औरंगाबादेत राहतात. त्यांच्याकडेच आकाशकुमार राहत होता. तो मजुरी काम करीत होता. सूत्रांनी सांगितले की, तो निराशेच्या गर्तेत होता.

तीनवेळा त्याने हातावर ब्लेड मारून घेतल्या होत्या. त्यानंतर एकदा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. साधारणत: सात ते आठ महिन्यात हे प्रकार घडले होते.

त्यानंतर त्याने तो राहत असलेल्या बहिणीच्या घरात दोन सप्टेंबरला छताच्या पंख्याला उपरणं बांधून त्याने आत्महत्या केली. ही बाब दिसताच नातेवाइकांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले; परंतु तोपर्यंत तो मृत झाला होता. या घटनेची नोंद सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली.

- Advertisement -