Home बातम्या आंतरराष्ट्रीय परदेशी एम्बेसीनं ‘ऑक्सिजन’साठी विरोधी नेत्याकडे मागितली मदत आणि…

परदेशी एम्बेसीनं ‘ऑक्सिजन’साठी विरोधी नेत्याकडे मागितली मदत आणि…

0
परदेशी एम्बेसीनं ‘ऑक्सिजन’साठी विरोधी नेत्याकडे मागितली मदत आणि…

[ad_1]

हायलाइट्स:

  • न्यूझीलंड दूतावासाकडून विरोधी पक्षाच्या नेत्याकडे ट्विटरवरून मदतीची मागणी
  • काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी व्ही श्रीनिवास यांनी तत्काळ पोहचवली मदत
  • शनिवारी काँग्रेसकडून फिलिपिन्स दूतावासालाही ऑक्सिजन सिलिंडरची मदत

नवी दिल्ली : न्यूझीलंड दूतावासनं रविवारी ऑक्सिजन सिलिंडरसाठी कथितरित्या काँग्रेस नेत्याकडे मदत मागितली. त्यानंतर उडालेल्या गोंधळामुळे न्यूझीलंड दूतावासाकडून मदतीचं ट्विट डीलिट करण्यात आलंय.

न्यूझीलंड दूतावासाच्या या ट्विटमुळे सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आल्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आलंय. आपल्याकडून चुकीनं हे ट्विट झाल्याचं स्पष्टीकरण यावर न्यूझीलंड एम्बेसीकडून देण्यात आलंय.

वाचा : ऑल इज नॉट वेल : भाजप नेत्यांकडून योगी आदित्यनाथांच्या दाव्यांची पोलखोल
रविवारी सकाळी न्यूझीलंड दूतावासाच्या ट्विटर हॅन्डलवरून एक ट्विट करण्यात आलं होतं. या ट्विटमध्ये दूतावासानं युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी व्ही श्रीनिवास यांच्याकडे ऑक्सिजन सिलिंडरसाठी मिळवण्यासाठी मदत मागितली होती.

या ट्विटमध्ये दूतावासानं काँग्रेसच्या एसओएस ट्विटर अकाऊंटलाही टॅग केलं होतं. ‘तुम्ही न्यूझीलंड दूतावासाला तत्काळ ऑक्सिजन सिलिंडर पोहचवण्याची व्यवस्था करू शकता का? धन्यवाद’ असं दूतावासानं या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

हे ट्विट पाहिल्यानंतर काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी तत्काळ ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली आणि ते दूतावासापर्यंत पोहचवलं. यापूर्वीही शनिवारी रात्री काँग्रेसकडून फिलिपिन्स दूतावासाला ऑक्सिजन सिलिंडर पोहचवण्यात आले होते.

हा वाद उभा राहिल्यानंतर, ‘आम्ही ऑक्सिजन सिलिंडरची तत्काळ व्यवस्था करण्यासाठी सर्व सोर्सेसकडे पोहचण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडून झालेल्या चुकीचा आम्हाला खेद आहे’ असं म्हणत न्यूझीलंड दूतावासाकडून हे ट्विट डिलीट करण्यात आलं.

‘कुंभा’त ७० लाख भाविकांचा सहभाग, १.९० लाख चाचण्या तर २६४२ करोनाबाधित
हत्या प्रकरणातील दोषी, बिहारचा ‘बाहुबली’ नेता शहाबुद्दीन याचा करोनानं मृत्यू

काँग्रेस आणि भाजपमध्ये वाकयुद्ध

परदेशी दूतावासाला ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वादाला सुरुवात झाली. काँग्रेसकडून सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

दूतावासाच्या या ट्विटनंतर मोठा वाद निर्माण झाला. परदेशी दूतावासाला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे मदत मागवी लागत असल्याचा आरोप करण्यात आला. यावर सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटलं.

‘मी हे जाणून हैराण आहे की परदेशी दूतावासाला एका विरोधी पक्षाच्या नेत्याकडे मदत मागावी लागत आहे, परराष्ट्र मंत्रालय झोपलंय का?’ असा सवाल काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी उपस्थित केला.

यावर परराष्ट्र मंत्र्यांनी ट्विट करत काँग्रेसवर राजकारण करत असल्याचा आरोप केला. ‘परराष्ट्र मंत्रालय कधीही झोपत नाही. आमचे लोक जगभरात आहेत. आम्हाला माहीत आहे की कोण काय करतंय’ असं प्रत्यूत्तर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दिलं.

‘परराष्ट्र मंत्रालय सर्व उच्च आयोग आणि दूतावासांच्या संपर्कात आहे. त्यांचे सर्व खासकरून कोविडशी निगडीत वैद्यकीय मागण्यांवर तत्काळ हालचाली केल्या जात आहे. यामध्ये रुग्णालयात त्यांच्या उपचाराच्या सुविधेचाही समावेश आहे’ असं ट्विट परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केलंय.

तर, भाजप नेते आणि लोकसभा खासदार तेजस्वी सूर्या यांनी फिलिपिन्स दूतावासाचा एसओएस (आपात्कालीन कॉल) कॉल फेक असल्याचं म्हटलंय.

यूथ काँग्रेसकडे रुग्णालयात असायला हवेत ते मेडिकल इक्विपमेंट आहेत, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मान खाली घालायला लावण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावीही तेजस्वी सूर्या यांनी केलाय.

LIVE : पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक २०२१ निकाल
LIVE Assembly Elections 2021: पश्चिम बंगालमध्ये सत्ता तृणमूलची की भाजपची?

[ad_2]

Source link