Home शहरे पुणे परप्रांतिय मजुरांची गावी परतण्याची धडपड.

परप्रांतिय मजुरांची गावी परतण्याची धडपड.

पुणे – राज्यात अडकलेल्या परप्रांतिय मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मामलेदार कचेरीबाहेर मोठी गर्दी केल्याचे शनिवारी दिसून आले.

या मजुरांना गावी जाण्यासाठीची नाव नोंदणी प्रक्रिया ऑनलाइनच होणार असल्याने या मजुरांना ई मेल-आयडीदेखील उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामुळे त्यांची निराशा झाल्याचे चित्र शनिवारी पहायला मिळाले. मात्र, तरीदेखील हार न मानता स्थानिक पोलीस स्टेशनलादेखील चौकशी करताना हे मजूर आढळले.

मात्र, पोलिसांकडून त्यांना याठिकाणी थांबण्यास मज्जाव केला जात होता.याशिवाय अनेक सुशिक्षित नागरिक तरुण- तरुणीदेखील स्थलांतराबाबतची विचारणा करण्यासाठी याठिकाणी आले होते. शहराच्या विविध भागांत अडकलेले हे मजूर जिल्हाधिकारी व मामलेदार कचेरीतून आपल्या स्थलांतराविषयीची माहिती घेण्यासाठी येत होते. मात्र, त्यासाठी आवश्यक माहिती मेल आयडीवर पाठवण्याबाबतची सूचना प्रवेशद्वारावरच लावले होते. मात्र, या मेलवर नेमकी कशी माहिती पाठवायची आहे, याचा उलगडा होऊ न शकल्याने केवळ मेल आयडी घेण्याशिवाय या मजुरांकडे पर्याय नव्हता. एकमेकांची समजुत घालत होते.