Home ताज्या बातम्या परप्रांतीयांना गावी जाण्याकरिता मदत करताना विश्रांतवाडी पोलीस स्टेशन व पी-4 चे माणुसकीचे दर्शन

परप्रांतीयांना गावी जाण्याकरिता मदत करताना विश्रांतवाडी पोलीस स्टेशन व पी-4 चे माणुसकीचे दर्शन

पुणे : प्रतिनिधी

परप्रांतीयांना गावी जाण्याकरिता मदत करताना विश्रांतवाडी पोलीस स्टेशन व पी – 4 माणुसकीचे दर्शन घडवीले.

भारत माझा देश आहे,सारे भारतीय माझे बांधव आहेत,ही प्रतिज्ञा आपण सर्वांनी म्हटलेली आहे,या प्रमाणेच आपल्याला वागायचं आहे,कोण आपले, कोणी परप्रांतीय असा भेदभाव न करता मानवतावादी दृष्टिकोनातून बघितले पाहिजे, अनेक राज्यातील लोक महाराष्ट्रामध्ये जास्त कष्टाचे,अवजड काम,मजुरी,सर्व प्रकारची छोटी-मोठी काम करतात तसेच रस्त्यावरचे हि सर्व व्यवसाय करतात यात या लोकांचा काय दोष ? त्या राज्यातील सरकारने त्यांच्या रोजगाराची व्यवस्था, औद्योगिकरण केलं असतं तर ते बिचारे कशाला आले असते, महाराष्ट्रातील उद्योगामध्ये त्यांना मागणी आहे म्हणून सुद्धा ते आपल्या इथे रोजगारासाठी येतात व तसेच आपल्या महाराष्ट्रातील असंख्य लोकही इतर राज्यात रोजगारासाठी वास्तव्याला आहेतच हे आपण विसरता कामा नये.


वपोनि . अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शन लाभले ,तसेच पोलिस कर्मचारी …
प्रफुल मोरे, विजय सावंत , विनायक रामाणे , यशवंत किरवे , प्रविण भालचिम , किशोर दुशिंग , अनिकेत भिंगारे , शेखर खराडे , संदीप देवकाते मार्गदर्शनाखाली संपूर्ण पी-४ टीम ( एसपीओ-SPO) यांनी गेल्या ७ दिवसापासून हजारो परप्रांतीय मजूर बंधूंना आपल्या गावी मोफत जाण्यासाठी प्रशासनासोबत आपले कर्तव्य पार पाडले.
कोरोना च्या संकटामध्ये पी-४ रिलायबल एच आर सर्विस प्राइवेट लिमिटेड चे मालक राज राठोड, व सहकारी मधील आदरणीय सर्व मालकांनी प्रत्यक्ष कृतीतून घेतलेली मानवतावादी भूमिका अतिशय योग्य असून महाराष्ट्र सहित सर्वच राज्याच्या सर्व व्यावसायिकांनी अशी भूमिका घेतली पाहिजे.