तिन वर्षांत ९४ बोगस डाँक्टरांवर करण्यात आली कारवाई
जिल्ह्यातील ग्रामिन रुग्णालयाती वैद्यकीय अधिकार्यांनी थाटले दवाखाने
मेडीकल व्यवसायात तर मोठी अफरा-तफरी परवाना एकाचा तर मेडीकल दुसर्याची
परभणी/प्रतिनिधी:- कोणताही वैद्यकीय परवाना नसनारे व केवळ पैशाच्या अमिषापोटी ग्रामिन भागातील जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या तथाकथित बोगस डाँक्टरांवर जिल्हा प्रशासनाने बडगा उचलल्याचे आपल्याला मागील काही दीवसात पहावयास मिळाले आहे.
परभणी जिल्ह्यात मागील तीन वर्षात ग्रामिन भागात १०१संशयित बोगस डाँक्टर आढळुन आले त्यापैकी ९४ बोगस डा्क्टरांवर गुन्हे दाखल झाले आहेत .यापुढेही ही कारवाई गतिमान करणार असल्याचे संकेत माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.बि.एम.शिंदे यांनी दीले आहेत.विषेश म्हणजे जिंतुर तालुक्यात सर्वाधिक ५३ तर मानवत तालुक्यात १६परभणी तालुक्यात ११,पुर्णा ४,पालम ३,सोनपेठ ३,सेलु ६,गंगाखेड ७ असे एकुण १०१ बोगस डॉक्टर आढळुन आले आहेत.
जिल्ह्यात सन२०१७-१८ मध्ये शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार धडक मोहीम राबवली होती त्यामध्ये जिल्ह्यातील १२४ खाजगी दवाखाण्याची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये ८संशयित बोगस वैद्यकीय व्यवसायिक आढळून आले होते त्यापैकी ४ बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्या डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करण्यात आली तर उर्वरित ४ जणांनी आपले दवाखाने बंद करुन पोबारा केला.
यापुढे असे वैद्यकीय व्यसायिक आढळून आल्यास महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३(१)व (2)अन्ववे संशयास्पद वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बि.एम शिंदे यांनी सांगितले आहे.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यानी थाटले दवाखाने,आरोग्य विभाग मात्र झोपेत
तालुक्यातील सर्व ग्रामिन रूग्णालयात रूग्णांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात गरजेनुसार वैद्यकीय अधिकार्याच्या नियुक्त्या करण्यात येतात परंतु असे काही महाशय ग्रामीण रुग्णालयात सेवेकरीता रुजु असताना देखील त्यांनी आपला खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी दवाखाने थाटले आहेत याकडे मात्र स्थानिक प्रशासन व आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करताना दीसत आहे .
मेडीकल परवाना एकाचा तर चालवनारा दुसराच
अनेक वीद्यार्थी बि.फार्मशी करून मेडीकल परवाना घेवुन ते परवाने दुसर्याला भाडेत्वावर देवुन थोडफार शिकलेला व्यक्ती मेडीकल थाटतो आणी आपला व्यवसाय थाटुन रूग्णाच्या जिवाशी खेळ चालु असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.