नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेचा निकाल अजून पूर्णपणे जाहीर झालेला नाही. मात्र सर्व 70 जागांचे कल हाती आले आहेत. या कलांनुसार दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांना साथ दिली आहे. आम आदमी पक्ष दिल्लीत पुन्हा गादी मिळवणार हे निश्चित झाले आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार आम आदमी पक्ष जवळपास 55 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 15 जागांवर पुढे आहे.
अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा दिल्ली काबीज करण्यात यशस्वी ठरलेले आहे. आपच्या कार्यकर्त्यांना आपल्या विजयावर पूर्ण विश्वास आहे. यामुळे दिल्लीतील आपचे कार्यालय सजवण्यात आलं आहे. रंगबिरंगी फुगे आणि अरविंद केजरीवाल यांचे पोस्टर्स लावून कार्यकर्ते अंतिम निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र भाजपने निकालापूर्वीच दिल्लीतील कार्यालयातही एक पोस्टर लावण्यात आलं आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो आहे. यासोबतच पोस्टरवर, विजयामुळे आम्ही गर्विष्ठ होत नाही. तर पराभवामुळे आम्ही निराश होत नाही असा संदेश लिहिण्यात आलेला आहे.