हायलाइट्स:
- आईने केलं होतं पर्ल निर्दोष असल्याचं वक्तव्य
- मुलीचा ताबा मिळवण्यासाठी वडिलांनी खोटे आरोप केल्याचं पीडितेच्या आईचं म्हणणं
- आपली बाजू मांडत पीडितेच्या वडिलांनी केला मोठा खुलासा
अंकिताला लोकांनी दिला होता २६ वर्षांनी मोठ्या मिलिंदसोबत लग्न न करण्याचा सल्ला, दिलं बेधडक उत्तर
वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झालं संपूर्ण चित्र
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या वडिलांनी एक निवेदन जाहीर केलं. ज्यात त्यांनी लिहिलं की, ‘माझी मुलगी गेले पाच महिने तिच्या आईसोबत होती. माझ्या मुलीसोबत माझा कोणताही संपर्क नव्हता. जेव्हा मी तिच्या शाळेत फी भरण्यासाठी गेलो तेव्हा ती येऊन मला बिलगली. ती घाबरलेल्या अवस्थेत होती. तिने माझ्यासोबत घरी येण्याचा हट्ट केला. मी तिला घरी घेऊन आल्यानंतर तिने घडलेली संपूर्ण घटना मला सांगितली. त्यानंतर मी पोलिसात तक्रार दाखल केली. मुलीची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली त्यात हे स्पष्ट झालं होतं की मुलगी खरं बोलत आहे. तिचं शोषण करण्यात आलं आहे.’
फोटोवरून पीडितेने केली आरोपीची ओळख
पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, ‘पीडितेने आरोपीची ओळख त्याच्या टीव्हीवरील पात्राच्या नावाने केली. तिने त्याचं नाव रघबीर असल्याचं म्हटल. मी कोणत्याच मालिका पाहत नसल्याने मला रघबीर कोण याची पुसटशीही कल्पना नव्हती. यानंतर मुलीला अनेक अभिनेत्यांचे फोटो दाखवण्यात आले तेव्हा तिने फोटो पाहून आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर आम्हाला कळालं हा अभिनेता पर्ल आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीची विचारपूसही केली आणि तिचा जबाब नोंदवून घेण्यासाठी एकटीला मॅजिस्ट्रेटकडे नेण्यात आलं.’
लग्न खोटं होतं मग संसदेत केलं ते काय…?, ‘तो’ व्हिडिओ शेअर करत भाजप नेत्याचा नुसरत जहांवर निशाणा