पलक तिवारीचं इन्स्टाग्रामवर दणदणीत कमबॅक, काही दिवसांपूर्वी डिलीट केलं होतं अकाउंट

पलक तिवारीचं इन्स्टाग्रामवर दणदणीत कमबॅक, काही दिवसांपूर्वी डिलीट केलं होतं अकाउंट
- Advertisement -


हायलाइट्स:

  • पलक तिवारीचे सोशल मीडियावर जोरदार कमबॅक
  • काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाऊंट केले होते डिलीट
  • कमबॅक करताना पलकने शेअर केले ग्लॅमरस फोटो

मुंबई : टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीच्या मुलीने, पलक तिवारीने काही दिवसांपूर्वी इन्टाग्रामवरून तिचे अकाउंट डिलीट केले होते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. परंतु पलकने पुन्हा एकदा तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट रिस्टोअर करत कमबॅक केले आहे. पलकच्या परत येण्यामुळे तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

श्वेता तिवारीने अभिनवचं केलं पितळ उघडं, CCTV फुटेज शेअर करून दाखवलं बाबांना का घाबरतो मुलगा
पलकने शेअर केले ग्लॅमरस फोटो

सोशल मीडियावरील कमबॅक करत पलकने तिच्या ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. तिचे हे ग्लॅमरस फोटो पाहून चाहत्यांनी लाईकचा वर्षावर केला असून त्यावर ते कमेन्ट करत आहेत. अकाऊंट रिस्टोर केल्यानंतर काही तासांतच पलकने खूप सारे फोटो शेअर केले. प्रत्येक फोटोमध्ये पलकचा वेगवेगळा अंदाज दिसत आहे. पलकच्या या फोटोंना हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘मी आता परत आले आहे.’


पलकने जेव्हा तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले तेव्हा श्वेता आणि अभिनव कोहली यांच्यातील भांडणामुळे तिने हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात होती. श्वेता आणि अभिनवमध्ये त्यांचा मुलगा रेयांशच्या कस्टीवरून वाद सुरू आहेत. हे दोघेजण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सोशल मीडियाद्वारे करत आहेत. अभिनववर आरोप करताना श्वेताने तिच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये अभिनवत तिच्याकडून रेयांशला हिसकावून घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनवर वेगवेगळ्या स्तरांतून टीका झाली होती. महिला आयोगानेही याची दखल घेतली होती. श्वेता आणि अभिनव यांच्यातील वाद आता कोर्टात पोहोचला आहे. लवकरच त्यावर निर्णय अपेक्षित आहे.





Source link

- Advertisement -