
बाली: इंडोनेशियाच्या बाली बेटावर असलेल्या पवित्र माउंट बातूर ज्वालामुखी जवळ पॉर्न व्हिडिओ चित्रीत केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या रशियन मॉडेलचा शोध सुरू केला आहे. हा व्हिडिओ एका पॉर्न वेबसाइटवर पोस्ट करण्यात आला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या मॉडेलचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
इंडोनेशियात माउंट बातूर ज्वालामुखी पवित्र समजला जातो. त्यामुळेच या ठिकाणी व्हिडिओ चित्रीत करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांकडून या प्रकाराचा तपास सुरू असून हा व्हिडिओ चित्रीत करण्यासाठी मदत करणाऱ्यांचाही शोध घेतला जात आहे. हा व्हिडिओ पॉर्न हब या पॉर्न वेबसाइटवरही पोस्ट करण्यात आला होता. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. लोकांनी या व्हिडिओचा निषेध करण्यास सुरुवात केल्यानंतर हा व्हिडिओ साइटवरून काढण्यात आला. हा व्हिडिओ मागील वर्षीचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.
वाचा:हिटलरला होतं पोर्न चित्रपटांचे व्यसन!; सेक्स दरम्यान करायचा ‘हे’ घृणास्पद प्रकार
पोलिसांनी व्हिडिओ चित्रीत झालेले ठिकाण शोधून काढले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. व्हिडिओ चित्रीत करणारे अजूनही बालीमध्ये आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे. हे जोडपं अजूनही इंडोनेशियात असेल तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले.
वाचा:चीनमुळे जगाला टेन्शन; अवकाशात पाठवलेल्या रॉकेटवरील नियंत्रण सुटले
इंडोनेशियाच्या कायद्यानुसार, अशाप्रकारच्या गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्यांना जवळपास तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होते. याआधीदेखील फेब्रुवारी महिन्यात एका मॉडेलने हत्तीवर बसून नग्न छायाचित्र काढले होते. त्यावरही वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी या महिलेची चौकशीही केली होती.
Source link